scorecardresearch

पिंपरी-चिंचवडमध्ये गणेशोत्सवात तीन हजार पोलिसांचा बंदोबस्त

गणेशोत्सव निर्विघ्नपणे पार पाडण्यासाठी पिंपरी-चिंचवड पोलिसांनी कंबर कसली आहे. शहरात तीन हजारपेक्षा अधिक पोलिसांचा बंदोबस्त असणार आहे.

police in pimpri chinchwad
पिंपरी-चिंचवड शहरात गणेशोत्सवासाठी बाहेरून बंदोबस्त मागवण्यात आला आहे. (फोटो सौजन्य- प्रातिनिधिक छायाचित्र)

लोकसत्ता प्रतिनिधी

पिंपरी: गणेशोत्सव निर्विघ्नपणे पार पाडण्यासाठी पिंपरी-चिंचवड पोलिसांनी कंबर कसली आहे. शहरात तीन हजारपेक्षा अधिक पोलिसांचा बंदोबस्त असणार आहे.

thackeray group organizes hou de charcha event in kalyan dombivali
कल्याण-डोंबिवलीत ‘होऊ द्या चर्चां’च्या चौक सभा; शिवसेना ‘उबाठा’तर्फे आयोजन
Rishi Sunak and Akshata Murthy
ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांच्या पत्नी अक्षता मूर्ती यांचा G20 मधून परतताच मोठा निर्णय, ऐकून बसेल आश्चर्याचा धक्का
The employee boarded the truck to collect the toll from the truck driver
ट्रक चालकाकडून टोलचे पैसे घेण्यासाठी कर्मचारी चढला चालत्या ट्रकवर; Video पाहून हसू आवरणार नाही…
aditya thackeray letter to bmc commissioner demand to disposed accumulated waste in city
मुंबईत साचलेल्या कचऱ्याच्या ढिगांची विल्हेवाट लावावी; आदित्य ठाकरे यांचे मुंबई महानगरपालिका आयुक्तांना पत्र

पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत दीड हजारपेक्षा अधिक गणेशोत्सव मंडळांना परवानगी देण्यात आली आहे. गणेशोत्सव कालावधीत शहरात मोठ्या प्रमाणात गर्दी होते. त्यामुळे कायदा आणि सुव्यवस्था राखण्याची मोठी जबाबदारी पोलिसांवर येते. पिंपरी-चिंचवड शहरात गणेशोत्सवासाठी बाहेरून बंदोबस्त मागवण्यात आला आहे.

आणखी वाचा-श्रीमंत दगडूशेठ गणपतीच्या मिरवणुकीला सुरुवात, डॉ. मोहन भागवत यांच्या हस्ते होणार प्राणप्रतिष्ठापना

गणेशोत्सवासाठी एक अपर पोलीस आयुक्त, पाच उपायुक्त, आठ सहायक आयुक्त, ५० पोलीस निरीक्षक, १४५ सहायक निरीक्षक आणि उपनिरीक्षक, एक हजार ८४० अंमलदार एवढे मनुष्यबळ उपलब्ध आहे. चार पोलीस निरीक्षक, २० सहायक निरीक्षक आणि उपनिरीक्षक, ४०० पोलीस कर्मचारी, ६०० होमगार्ड, एसआरपीएफच्या दोन कंपनी, श्वान बॉम्ब शोधक आणि नाशक विभागाची दोन पथके ही अधिकची कुमक शहर पोलिसांना मिळाली आहे.

रात्री दहा वाजता ध्वनिक्षेपक बंद करण्याचे आवाहन

गणेशोत्सव कालावधीत पाच दिवस रात्री बारापर्यंत ध्वनिक्षेपक लावण्यासाठी परवानगी दिली आहे. २३ ते २८ सप्टेंबर या दिवशी ही परवानगी असेल. सातव्या दिवशी अनेक भागातील विसर्जन होते. मात्र, त्या दिवशी ध्वनिक्षेपक वापरण्यासाठी परवानगी देण्यात आलेली नाही. त्यामुळे रात्री दहा वाजता ध्वनिक्षेपक बंद करण्याचे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.

Latest Comment
View All Comments
Post Comment

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: In pimpri chinchwad 3000 police personnel will be deployed during ganeshotsav pune print news ggy 03 mrj

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×