पिंपरी : घरासमोरील महापालिकेच्या वृक्षांवर रोषणाई केल्याप्रकरणी संजय तिवारी यांच्याविरोधात निगडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पिंपरी महापालिकेचे सहायक उद्यान अधीक्षक राजेश वसावे (वय ४३) यांनी फिर्याद दिली आहे. तिवारी यांनी निगडी प्राधिकरणातील आपल्या बंगल्यासमोरील महापालिकेच्या वृक्षांवर रोषणाई केली होती. ४ ते १७ नोव्हेंबरपर्यंत त्यांनी वृक्षांवर रोषणाई करत विद्रूपीकरण केले. त्यामुळे विद्रूपीकरण, पर्यावरण संरक्षण अधिनियमांतर्गत त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हेही वाचा : पिंपरी-चिंचवडकरांची दिवाळीत वाहन खरेदी जोरात… पाच हजार ३१३ वाहनांची खरेदी




दरम्यान, या रोषणाईला पर्यावरणप्रेमींनी तीव्र आक्षेप घेतला होता. रस्तादुभाजक, पदपथावरील वृक्षांवर रोषणाई करत झाडांचे संवर्धन, शहर विद्रूपीकरण या नियमांचे उल्लंघन केल्याचा आरोप करत कारवाईची मागणी प्रशांत राऊळ यांनी केली होती. अखेर महापालिकेने गुन्हा दाखल केला आहे.