पिंपरी : राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार आणि त्यांचे पुतणे आमदार रोहित पवार हे आरतीच्या निमित्ताने पिंपरी-चिंचवडमध्ये शक्तिप्रदर्शन करणार आहेत. रोहित पवार शनिवारी (२३ सप्टेंबर), तर अजित पवार रविवारी (२४ सप्टेंबर) शहरातील सार्वजनिक मंडळांत आरती करणार आहेत. तसेच इतर पक्षांचे नेतेही आरतीच्या माध्यमातून शहरात शक्तिप्रदर्शन करताना दिसतात.

राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीनंतर दोन्ही गटांनी पिंपरी-चिंचवडच्या राजकारणावर जास्त लक्ष केंद्रित केल्याचे दिसते. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा बालेकिल्ला असलेल्या शहराची धुरा राष्ट्रवादीने आमदार रोहित पवार यांच्यावर सोपविली आहे. गणेशोत्सवाचे निमित्त साधत रोहित शहरातील ताकत आजमावत आहेत.

Ministers from various states campaigned in Mira Bhayandar on Sunday
मिरा-भाईंदर शहरात रविवारी विविध राज्यातील मंत्री प्रचारात
Eknath Shinde
Eknath Shinde : तुम्ही गृहखातं, विधानसभा अध्यक्षपद मागितलं…
sachin pilot
धार्मिक मुद्द्यावर बोलणाऱ्या भाजपला ‘पढोगे तो बढोगे’ हे सांगण्याची वेळ; सचिन पायलट यांची टीका
Baramati protests that Pratibha Pawar was prevented from campaigning Inspection of Sharad Pawar bag Pune news
प्रतिभा पवार यांंना प्रचारापासून रोखल्याचे बारामतीत पडसाद; शरद पवार यांच्या बॅगची तपासणी
Demand money from company owner in name of MLA Pune news
आमदाराच्या नावाने कंपनी मालकाकडे पैशांची मागणी
Kangana Ranaut criticism that Priyanka Gandhi has no respect for democracy
प्रियंका गांधीना लोकशाहीचा आदर नाही,कंगना रानौतची टीका..
Priyanka Gandhi statement regarding those who show BJP flags during road shows
रोड-शो दरम्यान भाजपचे झेंडे दाखवणाऱ्यांना प्रियंका गांधी म्हणाल्या, तुम्हाला शुभेच्छा मात्र…

हेही वाचा : देखावे पाहण्यासाठी आजपासून गर्दी; पुण्यातील ‘हे’ प्रमुख रस्ते सायंकाळी पाचनंतर होणार बंद

शहरातील सार्वजनिक गणेश मंडळांच्या गणरायाची आरती शनिवारी त्यांच्या हस्ते केली जाणार आहेत. शहरातील समस्यांकडे नेते, प्रशासन कोणाचेही लक्ष नाही. त्या समस्या सोडविण्यासाठी सत्ताधाऱ्याला बुद्धी देण्याचे साकडे गणरायाला घालण्यासाठी रोहित पवार शनिवारी सायंकाळी शहरातील मंडळाच्या आरती करणार असल्याचे राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष तुषार कामठे यांनी सांगितले.

हेही वाचा : धक्कादायक : खडकवासला धरणाच्या जलाशयात सांडपाणी

गेल्या वर्षीही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एक दिवस आरतीचा हा उपक्रम राबविला होता. दिवसभरात ४५ मंडळांच्या गणरायाची आरती केली होती. अजित पवार हे रविवारी सकाळी दहापासून शहरात असणार आहेत. चिंचवडगावातील मोरया गोसावी मंदिरापासून सुरुवात करून पन्नास मंडळांना भेट देणार असल्याचे अजित पवार गटाचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांनी सांगितले.