scorecardresearch

पुण्यात बारावीतील विद्यार्थिनीने मारली कालव्यात उडी, सिंहगड रस्त्यावरील घटना; अग्निशमन दलाकडून शोध सुरू

सिंहगड रस्त्यावरील कालव्यात बारावीत शिकणाऱ्या एका युवतीने उडी मारल्याची घटना सोमवारी दुपारी घडली.

पुण्यात बारावीतील विद्यार्थिनीने मारली कालव्यात उडी, सिंहगड रस्त्यावरील घटना; अग्निशमन दलाकडून शोध सुरू
प्रातिनिधिक फोटो

पुणे : सिंहगड रस्त्यावरील कालव्यात बारावीत शिकणाऱ्या एका युवतीने उडी मारल्याची घटना सोमवारी दुपारी घडली. रात्री उशिरापर्यंत तिचा शोध लागला नाही. श्रावणी नितीन वानखेडे असे उडी मारलेल्या युवतीचे नाव आहे.

हेही वाचा – पुणे : म्हाडाच्या घरांसाठी कागदपत्रांच्या पडताळणीला विलंब; नागरिक हैराण, नवीन संगणक प्रणालीचा परिणाम

हेही वाचा – पुणे: शाळांना सीबीएसई मान्यतेची बनावट प्रमाणपत्र प्रकरणी पुण्यात गुन्हा दाखल

श्रावणी सिंहगड रस्त्यावरील एका महाविद्यालयात शिक्षण घेत आहे. सोमवारपासून तिची पूर्वपरीक्षा सुरू झाली. दुपारी ती महाविद्यालयात गेली. अर्धवट प्रश्नपत्रिका सोडवून ती वर्गातून बाहेर पडली. मोबाइलवर बोलत ती कालव्याजवळ गेली आणि तिने कालव्यात उडी मारली. तेथून जात असलेल्या दाेन तरुणांनी हा प्रकार पाहिला. पोलिसांना तसेच अग्निशमन दलाला तरुणांनी ही माहिती दिली. रात्री उशिरापर्यंत तिचा शोध घेण्यात आला. मात्र, तिचा ठावठिकाणा लागला नाही, असे सिंहगड रस्ता पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शैलेश संखे यांनी सांगितले.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 10-01-2023 at 10:58 IST

संबंधित बातम्या