scorecardresearch

Premium

अमली पदार्थ तस्कर प्रकरणात दोन पोलीस अटकेत; बंदोबस्तात निष्काळजीपणाचा ठपका

ताब्यात घेण्याची कारवाई सुरु असतानाच २ ऑक्टोबर रोजी ललित बंदोबस्तावरील पोलिसांना गुंगारा देऊन रुग्णालयातून पसार झाला.

2 police arrested in pune, drug peddler lalit patil case, carelessness in security of lalit patil
अमली पदार्थ तस्कर प्रकरणात दोन पोलीस अटकेत; बंदोबस्तात निष्काळजीपणाचा ठपका (संग्रहित छायाचित्र)

पुणे : अमली पदार्थ तस्कर ललित पाटील ससून रुग्णालयातून पसार झाल्याप्रकरणी दोन पोलिसांना अटक करण्यात आली. ससून रुग्णालयातील कैद्यांच्या उपचार कक्षात नियुक्तीस आलेल्या दोन पोलिसांनी कर्तव्यात कसुरी करुन पाटील याला पळून जाण्यास मदत केल्याप्रकरणी त्यांना अटक करण्यात आली आहे.

नाथाराम काळे आणि अमित जाधव अशी अटक करण्यात आलेल्या पोलिसांची नावे आहेत. ससून रूग्णालयातून अमली पदार्थ तस्कर ललित पाटील मेफेड्रोनची विक्री करत असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाला मिळाल्यानंतर पोलिसांच्या पथकाने ३० सप्टेंबर रोजी ललितचा साथीदारासह ससून रुग्णालयाच्या उपाहारगृहातील कामगाराला अटक केली. त्यांच्याकडून दोन कोटी रुपयांचे मेफेड्रोन जप्त करण्यात आले होते. तपासात ससूनच्या वाॅर्ड क्रमांक १६ मध्ये उपचार घेणारा ललित अमली पदार्थांची विक्री करत असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर उपचार घेणाऱ्या ललितला नोटीस बजाविण्यात आली. त्याला ताब्यात घेण्याची कारवाई सुरु असतानाच २ ऑक्टोबर रोजी ललित बंदोबस्तावरील पोलिसांना गुंगारा देऊन रुग्णालयातून पसार झाला.

हेही वाचा : पुणे : महाळुंगेत डुकरांसह टेम्पो लांबविला, चारजण अटकेत

या प्रकरणाची वरिष्ठ अधिकाऱ्यांनी गंभीर दखल घेऊन तातडीने चौकशी सुरू केली. चौकशीत दोषी आढळलेल्या बंदोबस्ताला असलेला एक सहायक निरीक्षक, दोन पोलीस उपनिरीक्षक आणि सात पोलीस कर्मचाऱ्यांना तडकाफडकी निलंबित करण्यात आले. त्यानंतर शुक्रवारी (१७ नोव्हेंबर) ललितला पसार होण्यास मदत केल्याप्रकरणी गुन्हे शाखेच्या युनिट दोनकडून पोलीस नाईक नाथाराम काळे आणि अमित जाधव यांना अटक करण्यात आली.

Latest Comment
View All Comments
Post Comment

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: In pune 2 police arrested for carelessness in security of drug peddler lalit patil at sassoon hospital pune print news rbk 25 css

First published on: 17-11-2023 at 16:10 IST

आजचा ई-पेपर : पुणे

वाचा
epaper image

संबंधित बातम्या

ताज्या बातम्या
तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×