पुण्यात पोलीस रेकॉर्डवरील गुंडाचा भर रस्त्यात कोयत्याने वार करून खून!

हल्ला केल्यानंतर घटनास्थळावरून हल्लेखोर पसार

Hooligan on a police record was stabbed to death
पूर्ववैमनस्यातून हत्या करण्यात आली असावी, असा पोलिसांचा अंदाज आहे. (संग्रहीत छायाचित्र)

पुणे शहरातील दत्तवाडी परिसरात पोलीस रेकॉर्डवरील गुंडाचा चौघांनी कोयत्याने वार करून खून केल्याची घटना घडली असून, हा प्रकार पूर्ववैमनस्यातून घडल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. अक्षय किरतकिर्वे (वय ३६) असं खून झालेल्या व्यक्तीचं नाव आहे.

पोलिसानी दिलेल्या माहितीनुसार, अक्षय किरतकिर्वे या गुंडावर अनेक गुन्हे दाखल असल्याने, त्याला तडीपार करण्यात आले होते. तरी देखील तो दत्तवाडी परिसरात फिरत होता. त्याच दरम्यान आज सायंकाळच्या सुमारास त्याच्यावर चौघांनी कोयत्याने वार केले, या अचानक झालेल्या हल्ल्याने अक्षय किरतकिर्वे हा गंभीर जखमी झाला व रक्ताच्या थारोळ्यात पडला.

दरम्यान या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच, घटनास्थळी जाऊन त्याला तत्काळ रूग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. तर घटनास्थळावरून हल्लेखोर पसार झाले असून त्यांच्या शोधासाठी पथके नेमण्यात आली आहेत. पूर्ववैमनस्यातून हत्या करण्यात आली असावी, अशी शक्यता दत्तवाडी पोलिस स्टेशनचे वरिष्ठ निरीक्षक कृष्णा इंदलकर यांनी व्यक्त केली आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व पुणे बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: In pune a hooligan on a police record was stabbed to death on the street msr 87 svk

Next Story
उसने पैसे वेळेत न दिल्यामुळे अंगावर अ‍ॅसिड टाकले
ताज्या बातम्या