पुणे : शेजारी राहणाऱ्या दाम्पत्यातील वाद सोडविणे एकाच्या अंगलट आले. भांडणे सोडविणाऱ्या एकाला बेदम मारहाण करून त्याचा खून करण्यात आल्याची घटना विश्रांतवाडीतील धानोरी परिसरात घडली. प्रशांत नारायण शिंदे (वय ४५, रा. माधवनगर, धानोरी, विश्रांतवाडी) असे खून झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी अभय शेलार (वय ३३, रा. मुळा रस्ता, आदर्शनगर, खडकी) याच्यासह चौघांना अटक करण्यात आली आहे. याबाबत विनोद नारायण शिंदे (वय ४३) यांनी विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

आरोपी अभय शेलार आणि प्रशांत शिंदे शेजारी आहेत. शुक्रवारी रात्री पावणे दहा वाजताच्या सुमारास अभयच्या आई-वडीलांचा वाद सुरू होता. त्याची आई प्रशांतच्या घरी आली. माझा नवरा वाद घालतो. त्याला समजावून सांगा, असे तिने प्रशांतला सांगितले. त्यानंतर प्रशांत अभयच्या घरी गेला. प्रशांतने त्याच्या वडिलांना समजावून सांगितले. प्रशांतने मद्यपान केले होते. मद्याच्या नशेत त्याने अभयच्या वडिलांना शिवीगाळ केली. त्यानंतर अभयच्या वडिलांनी या घटनेची माहिती अभयला दिली. त्यानंतर रात्री साडेदहाच्या सुमारास अभय, त्याचे मित्र निखिल, अभिजीत, सुमित यांना घेऊन आला. त्या चौघांनी प्रशांतला लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. या मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या प्रशांतला रुग्णालयात दाखल करण्यात आले.

Satara, Satara Protest against Illegal Tree Cutting, Tree Cutting , Innovative Campaign, Rajpath satara, marathi news
राजपथावरील झाडे तोडणाऱ्याबद्दल साताऱ्यात संताप, हरित साताराचे अभिनव आंदोलन
case of culpable homicide against the contractor in connection with the accident in Kondhwa
पुणे : कोंढव्यातील दुर्घटनेप्रकरणी ठेकेदारावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा
panvel crime news
पनवेल: बहिणीसोबत एकटा घरात दिसल्याने त्याला ठार केले, तळोजातील घटना
Meeting, families, cheated,
जुन्या ठाण्यातील पूनर्विकास प्रकल्पात फसवणूक झालेल्या कुटुंबियांची बैठक
A raid on an illegal moneylender who tried to crush him under a tractor
ट्रॅक्टरखाली चिरडण्याचा प्रयत्न करणाऱ्या अवैध सावकाराकडे छापेमारी; आक्षेपार्ह कागदपत्रे जप्त
Ulhasnagar, dangerous buildings,
उल्हासनगरात ३१६ धोकादायक इमारती, ५ इमारती राहण्यासाठी अयोग्य, तर ४३ मध्ये तात्काळ दुरुस्ती करण्याची गरज
friend, murder, argument,
पुणे : दारू पिताना वाद झाला अन् अघडित घडले…
garbage, Ghatanji,
यवतमाळच्या घाटंजीत कचऱ्याचे ढीग, मुख्याधिकाऱ्यांविरोधात जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार

हेही वाचा..पुणे : आत्मनिर्भर भारत योजनेअंतर्गत भविष्य निर्वाह निधीचा अपहार; बनावट कागदपत्रांद्वारे नऊ कोटी रुपयांची फसवणूक

उपचारांपूर्वीच प्रशांतचा मृत्यू झाला होता.

या घटनेची माहिती मिळताच आरोपी अभय आणि त्याचे मित्र तेथून पसार झाले. परिमंडळ चारचे पोलीस उपायुक्त विजयकुमार मगर, विक्रांत देशमुख, सहायक आयुक्त आरती बनसोडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक कांचन जाधव यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी मध्यरात्री चौघांना ताब्यात घेतले. गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक मोहन खंदारे तपास करत आहेत.