पुणे : भारती विद्यापीठ परिसरामधून एका शाळकरी मुलाचे ५० लाखांच्या खंडणीसाठी अपहरण करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. पोलिसांनी तातडीने तपास करून मुलाची सुटका केली.

अपहरणकर्ते पसार झाले असून, त्यांचा शोध घेण्यात येत असल्याची माहिती पोलिसांनी दिली. दहा वर्षांच्या मुलाचे ५० लाखांच्या खंडणीसाठी अपहरण करण्यात आले होते. याबाबत त्याच्या पालकांनी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. मुलाचे अपहरण झाल्याचे उघडकीस आल्यानंतर भारती विद्यापीठ आणि गुन्हे शाखेच्या पथकांनी तपास सुरू केला.

हेही वाचा…धक्कादायक! पुण्यात पार्किंगच्या वादातून महिलेला जाळून टाकण्याचा प्रयत्न

पोलीस मागावर असल्याचे समजताच मुलाला सोडून आरोपी पसार झाले. अपहरणाचा गु्न्हा संवेदनशील असून, आरोपींचा माग काढण्यात येत आहे. त्यांना पकडण्यासाठी पोलिसांची पथके रवाना करण्यात आली आहेत, अशी माहिती पोलिसांनी दिली.