पुणे : सांताक्रूझ येथील पुलाच्या कामावरून ठाकरे गट आणि शिंदे गटाच्या नेत्यांमध्ये आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. त्याच दरम्यान ठाकरे गटाचे नेते आमदार आदित्य ठाकरे हे पुणे दौर्‍यावर होते. त्यावेळी प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींसोबत संवाद साधताना आदित्य ठाकरे म्हणाले की, काल पोर्णिमा असल्याने त्यांना वेळ नव्हता. अमावस्या आणि पोर्णिमेला शेती करायला जातात. हे त्यांच्या आजपर्यंतच्या दौर्‍यावरून स्पष्ट होत आहे. त्यामुळे आता तरी पुलाचे उद्घाटन करून नागरिकांची वाहतूक कोंडीमधून सुटका करा, अशी भूमिका मांडत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर ठाकरे यांनी टिका केली.

यावेळी आदित्य ठाकरे म्हणाले की, सांताक्रूझ येथील पुलाच्या कामाबाबत एक फोटो ट्विट केला आहे. त्या पुलाचे काम पूर्ण झाले आहे. पण त्याचे उद्घाटन झाले नाही. त्यामुळे नागरिकांना वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागत आहे. केवळ व्हीआयपींना वेळ नसल्याने अद्यापपर्यंत उद्घाटन झाले नाही. तसेच दुसर्‍या एका पुलाचे काम अर्धवट आहे. त्याचे उदघाटन करण्यास घटनाबाह्य मुख्यमंत्री आतुर असल्याचे दिसत आहे. आजपर्यंत अर्धवट पुलाच्या कामाचे उदघाटन कोणत्याही मुख्यमंत्र्यांनी केल्याचे आपण पाहिले आहे का ? काल पोर्णिमा असल्याने त्यांना वेळ नव्हता. अमावस्या आणि पोर्णिमेला शेती करायला जातात. हे त्यांच्या आजवरच्या दौर्‍यांवरून स्पष्ट होत आहे. त्यामुळे आता तरी पुलाचे उद्घाटन करून नागरिकांची वाहतूक कोंडीमधून सुटका करा, अशी भूमिका मांडत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर त्यांनी टीका केली.

kolhapur mla prakash awade, claim on hatkanangale lok sabha seat
“मी महायुतीचाच! मोदींना पंतप्रधान करण्यासाठी लढणार”, बंडखोर आमदार प्रकाश आवाडे यांचा पवित्रा
Verbal dispute between BJP MLA sanjay Kute and Sena MLA Sanjay Gaikwad
“सकाळी अर्ज भरला अन संध्याकाळी…”, भाजपचे आमदार कुटे व सेनेचे आमदार गायकवाड यांची शाब्दिक जुगलबंदी
Vijay Shivtare
शिवतारे गरजले, “बारामतीमधून पवार यांची हुकूमशाही संपविण्यासाठीचे माझे धर्मयुद्ध..”
Devendra Fadnavis criticizes the disgruntled and dissatisfied leaders of the party
“बसमध्ये जागा मिळाली नाही की बसमागे दगड मारत धावणारे असतात…”, देवेंद्र फडणवीस असे का म्हणाले?

हेही वाचा : मुळा आणि मुठा नदीपात्राच्या संवर्धनासाठी जनआंदोलन उभारण्याची आवश्यकता – आदित्य ठाकरे

“राजकीय मंडळी गुंडांना भेटून त्यांचे सत्कार करतात, पोलीस स्टेशनमध्ये गोळीबाराची घटना घडते”

राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. हजारो कोटींचे ड्रग्ज आढळले आहे. त्या प्रश्नावर आदित्य ठाकरे म्हणाले की, अमली पदार्थांपासून तरुणांनी दूर राहिले पाहिजे. आपण काही घटना पाहिल्या तर काही राजकीय मंडळी गुंडांना भेटून त्यांचे सत्कार करतात. तर दुसर्‍या बाजूला पोलीस स्टेशनमध्ये गोळीबाराची घटना घडते. त्या सर्व घडामोडी दरम्यान आता ड्रग्ज सापडत आहेत. त्यामुळे राज्यात आज सरकार आहे की नाही, हा प्रश्न निर्माण झाला आहे. तसेच काही आमदार पोलिसांबाबत काहीही विधान करत आहेत. आम्हाला कोणी हात लावू शकत नाही. त्यामुळे हे सरकार बिल्डर, ठेकेदार की सर्व सामान्य नागरिकांचे सरकार आहे, असा सवाल उपस्थित करत ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली.

हेही वाचा : भिवंडीत अल्पवयीन मुलाचे अपहरण करून खून; पुण्यातील सराईत अटकेत

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंवर टीका

राज्यातील छोटे छोटे पक्ष संपवा असे विधान भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले आहे. त्या प्रश्नावर आदित्य ठाकरे म्हणाले की, भाजपने लोकशाही संपवली आहेच. २०२२ मध्ये शिवसेना, २०२३ मध्ये राष्ट्रवादी फोडली आणि त्यांचा एक परिवार फोडला. तसेच आता २०२४ मध्ये काँग्रेस पक्ष फोडण्याचा प्रयत्न केला जात आहे. तसेच भाजपाला लोकशाही नको आहे आणि तुम्ही मला ज्या व्यक्ती बाबत प्रश्न विचारला, त्यांचा चायनाशी जवळचा संबध असल्याचे म्हणताच उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला.