पुणे : दरोडा टाकण्याच्या तयारीतील चोरट्यांच्या टोळीला कोंढवा पोलिसांनी अटक केली. चोरट्यांकडून तीक्ष्ण शस्त्रे, मिरची पूड, दुचाकी जप्त करण्यात आली. अविनाश धनाजी शिंदे (वय ३२, रा. मांगडेवाडी, कात्रज), रोहीत राजु चौधरी (वय २४, रा. येवलेवाडी, कोंढवा), आकाश किशोर चौधरी (वय २९, रा. शेवाळवाडी), विशाल किशोर चौधरी (वय २७, रा. येवलेवाडी), अभिजीत किशोर चौधरी (वय २३, रा.आंबेडकर चौक) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.

हेही वाचा : पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांच्या बदलीला स्थगिती

गुरुवारी (५ सप्टेंबर) रात्री पिसोळी भागातील धर्मावत पेट्रोलपंपाच्या पाठीमागील मोकळ्या जागेत चोरट्यांची टोळी दरोडा घालण्याच्या तयारीत असल्याची माहिती कोंढवा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनय पाटणकर यांना मिळाली. पोलिसांच्या पथकाने सापळा लावून शिंदे, चौधरी यांना पकडले. त्यांच्याकडून तलवार, मिरची पूड, दुचाकी जप्त करण्यात आली. पोलीस निरीक्षक पाटणकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक बालाजी डिगोळे आणि पथकाने ही कारवाई केली.