पुणे : चारित्र्याचा संशयावरुन उंदीर मारण्याचे ओैषध पाण्यात प्यायला देऊन महिलेचा खूनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी पोलिसांनी पती, सासू, सासऱ्यांसह सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला. याप्रकरणी पतीला लोणीकंद पोलिसांनी अटक केली.

हनुमंत अंकुश गिरी असे अटक करण्यात आलेल्या पतीचे नाव आहे. याप्रकरणी सासू सरस्वती, सासरे अंकुश, दीर आदित्य (तिघे रा. सुलतानपूर, जि. बीड), नणंद सुजाता प्रल्हाद भारती, शिवाजी भारती (रा. वडवणी, जि. बीड) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत साक्षी हनुमंत गिरी (वय २३, रा. केसनंद, नगर रस्ता) हिने लोणीकंद पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. साक्षीचा पाच वर्षांपूर्वी हनुमंत याच्याशी विवाह झाला होता. विवाहानंतर पती, सासू, सासरे आणि नातेवाईकांनी तिला त्रास देण्यास सुरुवात केली. तिचा शारिरिक आणि मानसिक छळ केला.

rape case in Gaziayabad
प्रियकराने केलेला बलात्कार लपवण्यासाठी आई करायची १० वर्षांच्या मुलीचा छळ, वेश्या व्यवसायात ढकलण्याचाही प्रयत्न
in Nagpur, Attempted Gang Rape, Raises Concerns, Women Safety, Attempted Gang Rapein Nagpur, crime in nagpur, nagpur crime, police, nagpur news, marathi news,
गृहमंत्र्यांच्या गृहशहरात महिला असुरक्षित? भरदुपारी गँगरेपचा प्रयत्न
Hyderabad Inter-Faith Couple Attacked By Muslim
हैदराबादमध्ये आंतरधर्मीय जोडप्यावर हल्ला, VIDEO व्हायरल झाल्यानंतर पोलिसांकडून कारवाई, ४ जण गजाआड
Boy killed for resisting unnatural act Sheel Daighar police arrests two
अनैसर्गिक कृत्यास विरोध केल्याने मुलाची हत्या, शीळ डायघर पोलिसांनी केली दोघांना अटक

हेही वाचा…आरटीओकडून कारवाईचे मोठे पाऊल! ओला, उबरला कारणे दाखवा नोटीस… काय आहे कारण?

साक्षीचा पती हनुमंत कामानिमित्त केसनंद परिसरात स्थायिक झाला होता. हनुमंतने तिच्या चारित्र्याचा संशय घेतला. उंदीर मारण्याचे ओैषध पाण्यात टाकून साक्षीला देऊन तिचा खूनाचा प्रयत्न केल्याचे साक्षीने फिर्यादीत म्हटले आहे. सहायक पोलीस निरीक्षक भालेराव तपास करत आहेत.