scorecardresearch

Premium

बिबवेवाडीतील गुंडाविरुद्ध झोपडपट्टी दादा प्रतिबंधक कायद्यान्वये कारवाई; पोलीस आयुक्तांच्या आदेशाने अमरावती कारागृहात रवानगी

भरगुडेविरुद्ध बिबवेवाडी, भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात शासकीय कर्मचाऱ्याला मारहाण, बेकायदा शस्त्र बाळगणे, बाललैंगिक अत्याचार, तसेच दरोड्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हे दाखल आहेत.

pune bibvewadi goon, amravati jail, pune goon sent to amravati jail, pune police commissioner, mpda act
बिबवेवाडीतील गुंडाविरुद्ध झोपडपट्टी दादा प्रतिबंधक कायद्यान्वये कारवाई; पोलीस आयुक्तांच्या आदेशाने अमरावती कारागृहात रवानगी (संग्रहित छायाचित्र)

पुणे : बिबवेवाडी भागात दहशत माजविणाऱ्या गुंडाविरुद्ध पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी झोपडपट्टी दादा प्रतिबंधक कायद्यान्वये (एमपीडीए) कारवाई करण्याचे आदेश दिले. गुंडाला वर्षभरासाठी अमरावती कारागृहात स्थानबद्ध करण्यात येणार आहे.

सनी संतोष भरगुडे (वय २४, रा. निलेश काॅम्प्लेक्स, योगायोग सोसायटी, बिबवेवाडी) असे कारवाई केलेल्या गुंडाचे नाव आहे. भरगुडेविरुद्ध बिबवेवाडी, भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात शासकीय कर्मचाऱ्याला मारहाण, बेकायदा शस्त्र बाळगणे, बाललैंगिक अत्याचार, तसेच दरोड्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हे दाखल आहेत.

Proactive action against accused in Sharad Mohol murder case pune news
शरद मोहोळ खून प्रकरणातील आरोपींवर मोक्का कारवाई; मुख्य सूत्रधार गणेश मारणेचा शोध सुरूच
PM Narendra Modi
”नव्या सर्वोच्च न्यायालयाच्या संकुलासाठी ८०० कोटी मंजूर”, मोदी म्हणाले, ”नवीन संसद भवनाप्रमाणे…”
Gyanvapi Case
ज्ञानवापी प्रकरण : प्रार्थनास्थळांवरील कायदा अन् त्याच्या समोरील आव्हाने
bombay hc quashes fir against college student for rash driving that killed stray dog
वाहनाखाली चिरडून भटक्या श्वानाचा मृत्यू; आरोपी विद्यार्थ्याच्या शैक्षणिक कारकिर्दीवर परिणाम नको, न्यायालयाकडून गुन्हा रद्द

हेही वाचा : ‘दादा कचऱ्याची गाडी येत नाही’, भरकार्यक्रमात महिलेची तक्रार, अजित पवारांनी दिलं मिश्किल उत्तर, म्हणाले…

भरगुडे याच्या विरुद्ध झोपडपट्टी दादा प्रतिबंधक कायद्यान्वये कारवाई करण्याचा प्रस्ताव बिबवेवाडी पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक सविता ढमढेरे, गुन्हे प्रतिबंधक शाखेचे पोलीस निरीक्षक ए. टी. खोबरे यांनी तयार केला होता. पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी प्रस्तावास मंजुरी देऊन भरगुडेला वर्षभरासाठी अमरावती कारागृहात स्थानबद्ध करण्याचे आदेश दिले.

Latest Comment
View All Comments
Post Comment

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: In pune bibvewadi goon sent to amravati jail for one year under mpda act by police commissioner pune print news rbk 25 css

First published on: 01-10-2023 at 15:54 IST

आजचा ई-पेपर : पुणे

वाचा
epaper image

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×