पुणे : कौटुंबिक दौऱ्यातील छायाचित्राबरोबर छेडछाड करून चुकीचे छायाचित्र दाखविण्यात आले. त्यासंदर्भात मी उत्तर दिले आहे. रोहित पवार यांना योग्य वेळी उत्तर दिले जाईल. त्यांना लवकर मोठे होण्याची घाई झाली आहे, अशा शब्दांत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी रोहित पवार यांच्यावर टीका केली. राजकारणात आयुष्य जाते आणि मगच माणूस मोठा होतो, असेही बावनकुळे यांनी सांगितले.
भाजपच्या वतीने आयोजित शहराध्यक्ष क्रिकेट करंडक स्पर्धेचे उद्घाटन त्यांच्या हस्ते झाले. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. विधिमंडळाच्या अधिवेशनात विरोधकांकडे कोणतेही विषय नाहीत. मात्र सरकार त्यांच्या सर्व प्रश्नांना उत्तरे देतील आणि राज्यातील जनतेला न्याय देईल, असे बावनकुळे यांनी सांगितले.
हेही वाचा : दोन तासांचे काम अवघ्या ४० मिनिटांत, पुणे- मुंबई द्रुतगतीमार्गावरील वाहतूक वेळेआधीच सुरू
मराठा समाजाला आरक्षण देण्याची भूमिका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतली आहे. कोणत्या कायद्याने आरक्षण मिळेल, यादृष्टीने प्रयत्न सुरू आहेत. राज्य सरकार आरक्षण देणारच आहे. राज्यातील सर्वपक्षीय मराठा नेते आणि जरांगे यांनी एकत्र येऊन समाजाचा फायदा कशात आहे, हे पाहिले पाहिजे. मागासर्गीय आयोग आणि सरकार यांच्यात काय सुरू आहे, याची माहिती नाही, असे बावनकुळे यांनी सांगितले.
हेही वाचा : पुणे : गावांचे पालटले रूप! पाबळ परिसरारील ११४ गावे झाली स्वयंपूर्ण
बावनकुळे म्हणले की, आगामी लोकसभा निवडणुकीतील महायुतीच्या जागावाटपा बाबत देवेंद्र फडणवीस काहीच बोलले नव्हते. मात्र त्यांच्या विधानाचा चुकीचा अर्थ काढण्यात आला. कुठल्याही जागेबाबत अद्यापही चर्चा झालेली नाही. महायुती अभेद्य आहे. महायुतीचे सव्वादोनशे आमदार विधानसभेत दिसतील. शिवसेनेबरोबर युती असताना कधीही धोका दिला नाही. मोठा भाऊ या नात्यानेच कायम भूमिका मांडली. बाळासाहेबांचे विचार घेऊन शिवसेना चालली असती तर युती तुटली नसती. महायुतीमधअये दुजाभाव भाजप करत नाही.