पुणे: घरात अडकलेल्या बेशुद्ध बहीण आणि भावाला वेळेत रूग्णालयात दाखल करून अग्निशमन दलाच्या जवानांनी त्यांना जीवदान दिले आहे. ही घटना रविवारी रात्री सव्वा दहाच्या सुमारास वानवडीमधील विकास नगर, कृष्ण कन्हैया सोसायटीत दुसऱ्या मजल्यावर घडली. अग्निशमन दल नियंत्रण कक्षाला वानवडीतील सदनिकेत भाऊ आणि बहिण दरवाजा लॉक होऊन अडकले असल्याची माहिती रविवारी रात्री मिळाली. त्यानुसार तातडीने बीटी कवडे रस्ता आणि कोंढवा खुर्द अग्निशमन केंद्र येथील अग्निशमन वाहन रवाना झाले.घटनास्थळी पोहोचताच तिथे उपस्थित पोलिस कर्मचारी यांच्याकडून माहिती घेतली असता, घरात भाऊ (वय १९) आणि बहिण (वय २४) अडकले असल्याची माहिती मिळाली. दोघेजण मानसिक विंवचनेत असल्याची माहिती मिळाली. ते जीवाचे बरे वाईट करण्याचे सांगत आहेत. त्याचवेळी घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन जवानांनी डोअर ब्रेकर, कटावणी, पहारीचा वापार करून दहा मिनिटातच दरवाजा तोडून घरात प्रवेश केला. त्याचवेळी बहीण भाऊ बेशुद्ध अवस्थेत होते.

हेही वाचा : गोखले संस्थेचे कुलगुरू डॉ. अजित रानडे यांचा राजीनामा

Nana Kate, Ajit Pawar, Nana Kate withdrew election,
चिंचवडमधून अजित दादांच्या शिलेदाराचे बंड शमले; नाना काटेंची निवडणुकीतून माघार
Sharad Pawar On Devendra Fadnavis CM Oath Ceremony
Sharad Pawar : महायुती सरकारच्या शपथविधीला का नाही…
Pune hit and run case
पुण्यात पुन्हा हिट अँड रन! रस्त्यावर फटाके फोडणाऱ्याला भरधाव कारने दिली धडक; ३५ वर्षीय व्यक्तीचा जागीच मृत्यू
ajit ranade resigned
गोखले संस्थेचे कुलगुरू डॉ. अजित रानडे यांचा राजीनामा
Manoj Jarange News
Manoj Jarange : “मराठे निवडणूक लढवणार नाहीत, कारण एका जातीवर…”; मनोज जरांगेंची मोठी घोषणा
DGP rashmi shukla visited RSS headquarters at Nagpur, nana patole complaint to election commission of india
Breaking: पोलीस महासंचालक रश्मी शुक्लांची निवडणूक आयोगाकडून बदली; मतदान १५ दिवसांवर असताना मोठी घडामोड!
Who is Madhurima Raje?
Madhurima Raje : सतेज पाटील ज्यांच्यामुळे ढसाढसा रडले त्या मधुरिमा राजे कोण आहेत?
Bullet Train Bridge Collapse in Anand Gujarat
Bullet Train Bridge Collapse : बुलेट ट्रेन प्रकल्पाचा पूल कोसळला, तीन मजूर ठार; ढिगाऱ्याखाली अनेकजण अडकले, बचावकार्य जारी

अग्निशमन दलाच्या वाहनातूनच जवळच असलेल्या एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. जवानांनी डॉक्टर यांच्याकडे त्या दोघांविषयी चौकशी केली असता, वेळेत उपचारासाठी दाखल केल्याने यांचे प्राण वाचले आहे. दोघेही लवकरच बरे होतील असे सांगण्यात आले. भाऊबीजेच्या दिवशी भाऊ आणि बहिणेचे प्राण वाचवू शकल्याने जवानांनी आनंद व्यक्त केला आहे. वाहनचालक दत्ता अडाळगे, सत्यम चौंखडे तसेच जवान सुभाष खाडे, सागर दळवी, निलेश वानखेडे, श्रेयस मेटे, महेश पांडे, सुरज हुलवान, हर्षवर्धन खाडे, अनुराग पाटील, रितेश मोरे यांनी ही कामगिरी केली.

Story img Loader