पुणे: घरात अडकलेल्या बेशुद्ध बहीण आणि भावाला वेळेत रूग्णालयात दाखल करून अग्निशमन दलाच्या जवानांनी त्यांना जीवदान दिले आहे. ही घटना रविवारी रात्री सव्वा दहाच्या सुमारास वानवडीमधील विकास नगर, कृष्ण कन्हैया सोसायटीत दुसऱ्या मजल्यावर घडली. अग्निशमन दल नियंत्रण कक्षाला वानवडीतील सदनिकेत भाऊ आणि बहिण दरवाजा लॉक होऊन अडकले असल्याची माहिती रविवारी रात्री मिळाली. त्यानुसार तातडीने बीटी कवडे रस्ता आणि कोंढवा खुर्द अग्निशमन केंद्र येथील अग्निशमन वाहन रवाना झाले.घटनास्थळी पोहोचताच तिथे उपस्थित पोलिस कर्मचारी यांच्याकडून माहिती घेतली असता, घरात भाऊ (वय १९) आणि बहिण (वय २४) अडकले असल्याची माहिती मिळाली. दोघेजण मानसिक विंवचनेत असल्याची माहिती मिळाली. ते जीवाचे बरे वाईट करण्याचे सांगत आहेत. त्याचवेळी घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन जवानांनी डोअर ब्रेकर, कटावणी, पहारीचा वापार करून दहा मिनिटातच दरवाजा तोडून घरात प्रवेश केला. त्याचवेळी बहीण भाऊ बेशुद्ध अवस्थेत होते.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा