scorecardresearch

Premium

गुप्तधनाचा मोह अंगलट; व्यावसायिकाची ३० लाखांची फसवणूक

पिशवीत सोन्याची नाणी आहेत. पिशवी लगेच उघडू नका, असे चोरट्यांनी व्यावसायिकाला सांगितले.

pune businessman cheated for 30 lakhs, 30 lakhs given by businessman for secret money
गुप्तधनाचा मोह अंगलट; व्यावसायिकाची ३० लाखांची फसवणूक (संग्रहित छायाचित्र)

पुणे : गुप्तधन सापडल्याच्या आमिषाने बाणेर भागातील एका व्यावासयिकाची चोरट्यांनी ३० लाख रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी एका महिलेसह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत एका व्यावसायिकाने खडकी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

तक्रारदार बाणेर भागात राहायला आहे. त्यांचे ओैषध विक्रीचे दुकान आहे. काही महिन्यांपूर्वी त्यांची आरोपींशी ओळख झाली होती. गुप्तधन सापडल्याची बतावणी चोरट्यांनी त्यांच्याकडे केली होती. सोने-चांदीची नाणी स्वस्तात देण्याचे आमिष चोरट्यांनी त्यांना दाखविले होते. चोरट्यांच्या आमिषाला व्यावसायिक बळी पडला. ३० लाख रुपयांमध्ये व्यवहार ठरला.

Honeytrap in Gondia
गोंदियात हनीट्रॅप, इन्स्टाग्रामवर मैत्री अन् अश्लील चित्रफीत बनवून ब्लॅकमेलिंग; व्यावसायिकाकडून उकळले २ लाख रुपये
crime-thane
कल्याणमध्ये दुकानात येऊन तीन महिलांनी व्यावसायिकाला लुटले
Kalyan businessman cheated, businessman cheated in kalyan, google pay fraud, businessman of kalyan cheated on google pay
कल्याणमध्ये ओळखीच्या इसमाकडून व्यावसायिकाची फसवणूक
Pune Kasba Peth Ganpati Mandal Make Live Decoration With Human Artist Know Amazing History Of Manache Ganpati
बाप्पाच्या आगमनाला पुणेकरांचा सजीव देखावा! कसबा पेठेतील ‘या’ मंडळाची भन्नाट कल्पना कशी सुरु झाली?

हेही वाचा : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार म्हणाले, ‘सध्या देशात असत्याचा मार्ग अवलंबून राजकीय अस्थिरता…’

त्यानंतर चोरट्यांनी त्यांना चाकण भागात बोलावून घेतले. पिशवीत सोन्याची नाणी आहेत. पिशवी लगेच उघडू नका, असे सांगून चोरट्यांनी त्यांच्याकडून ३० लाख रुपये घेतले. व्यावसायिक तेथून घरी आला. त्याने पिशवी उघडून पाहिली. पिशवीतील सोन्याच्या नाण्यांची तपासणी त्यांनी केली. तेव्हा नाणी बनावट असल्याचे उघडकीस आले. फसवणूक झाल्याचे उघडकीस आल्यानंतर व्यावसायिकाने पोलीस ठाण्यात धाव घेतली.

Latest Comment
View All Comments
Post Comment

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: In pune businessman cheated for rupees 30 lakhs with the lure of secret money pune print news rbk 25 css

First published on: 25-09-2023 at 09:48 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×