पुणे : पोलीस, सीबीआय कारवाईची भीती दाखविणे, तसेच घरातून कामाची संधी अशा प्रकारची आमिषे दाखवून सायबर चोरटे नागरिकांची फसवणूक करत आहेत. चोरट्यांनी वेगवेगळ्या घटनेत नागरिकांची एक कोटी २६ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. कोथरुड भागातील एका महिलेची घरातून ऑनलाइन पद्धतीने कामाची संधी (ऑनलाइन टास्क) असे आमिष दाखवून चोरट्यांनी चार लाख ३२ हजार रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला. सुरुवातीला महिलेला चोरट्यांनी परतावा दिला. परतावा मिळाल्यानंतर आणखी रक्कम गुंतविली. फसवणूक झाल्याचे उघडकीस आल्यानंतर महिलेने कोथरुड पोलीस ठाण्यात तक्रार दिली.

वाघोली भागातील एका तरुणाला अटक करण्याची भीती दाखवून चोरट्यांनी त्याच्याकडून ४१ लाख ४० हजार रुपये उकळले. एका प्रकरणात पोलिसांकडून कारवाई करण्यात येणार आहे. त्वरीत पैसे दिल्यास कारवाईला सामाेरे जावे लागेल, अशी भीती दाखवून चोरट्यांनी तरुणाची फसवणूक केली. याबाबत तरुणाने वाघोली (लोणीकंद) पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. परदेशी चलन व्यवहारात (फाॅरेक्स ट्रेडिंग) गुंतवणुकीच्या आमिषाने वाघोलीतील एका तरुणाची ३३ लाख ७८ हजार ३२० रुपयांची फसवणूक केली. याबाबत तरुणाने वाघोली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.

boy and girl conversation my dreams joke
हास्यतरंग : माझी स्वप्न…
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू

हेही वाचा : पुणे : चतु:शृंगी पोलिसांनी जप्त केलेल्या मोटारींचे टायर चोरीला, पोलीस ठाण्याच्या आवारात चोरी झाल्याने खळबळ

४९ लाखांची फसवणूक प्रकरणात वर्षभरानंतर गुन्हा दाखल

शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने हडपसर परिसरातील एकाची सायबर चोरट्यांनी ४९ लाख ५५ हजार रुपयांची फसवणूक केली. हा प्रकार २१ डिसेंबर २०२३ ते फेब्रुवारी २०२४ या कालावधीत घडला होता. चोरट्यांनी शेअर बाजारात गुंतवणूक केल्यास चांगला परतावा मिळेल, असे आमिष दाखवून तक्रारदाराला पैसे भरण्यास सांगितले. सुरुवातीला त्याला परतावा दिला. त्यानंतर तक्रारदाराने आणखी रक्कम चोरट्यांच्या बँक खात्यात जमा केली. पैसे जमा केल्यानंतर परतावा दिला नाही. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी पोलिसंकडे तक्रार दिली.

Story img Loader