scorecardresearch

पुणे : वाढदिवस साजरा करणाऱ्या टोळक्याची दहशत

२५ ते ३० जणांच्या विरोधात गुन्हा उत्तमनगर परिसरातील घटना

In Pune crowd spreading terror by celebrating birthday on street
वाढदिवस साजरा करणाऱ्या टोळक्याची दहशत

शहरात भररस्त्यात वाढदिवस साजरा करुन दहशत माजविण्याचे प्रकार वाढीस लागले आहेत. एनडीए रस्त्यावरील उत्तमनगर परिसरात वाढदिवस साजरा करताना दहशत माजवणाऱ्या टोळक्याच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

या प्रकरणी संकेत मालखेडकर, सुजल डाखोळे, ओंकार काशीदर, साहिल इंगोले यांच्यासह २५ ते ३० जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस कर्मचारी विशाल वारुळे यांनी या संदर्भात उत्तमनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. शहरात प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आले आहेत. एनडीए रस्त्यावरील उत्तमनगर परिसरात कोहिनूर हॉटेलशेजारी मोकळ्या जागेत मध्यरात्री एकच्या सुमारास मालखेडकर, डाखोळे, काशीद, इंगोले आणि साथीदार जमले. त्यांना रवी राठोडचा वाढदिवस साजरा केला. टोळक्याने आरडाओरडा करुन दहशत माजविली.

या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलीस तेथे पोहोचले. पसार झालेल्या आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून सहायक पोलीस निरीक्षक पवार तपास करत आहेत.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: In pune crowd spreading terror by celebrating birthday on street pune print news asj

ताज्या बातम्या