पुणे : उघड्यावर असलेल्या विद्युत वाहिनीचा धक्का बसल्याने सफाई कर्मचारी महिलेचा मृत्यू झाल्याची घटना बालेवाडी भागात घडली.चंद्रकला नरसिंग मिरदुडे (वय ४५, रा. विसर्जन घाट, बालेवाडी गाव) असे मृत्युमुखी पडलेल्या महिलेचे नाव आहे. याबाबत चंद्रकला यांचा मुलगा संदीप यांनी चतु:शृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चंद्रकला बालेवाडीतील अमर टेकपार्क इमारतीत सफाई कर्मचारी म्हणून काम करत होत्या. कंत्राटी पद्धतीने त्या तेथे काम करत होत्या. मंगळवारी दुपारी शहरात मुसळधार पाऊस झाला. काम आटोपल्यानंतर चंद्रकला बसथांब्याकडे निघाल्या होत्या. बालेवाडी भागातील पदपथाच्या बाजूला पाणी साचले होते. या परिसरात विद्युत वाहिनी उघड्यावर पडली होती. तेथून निघालेल्या चंद्रकला यांना विजेचा धक्का बसल्याने त्या कोसळल्या. बेशु्द्धावस्थेत चंद्रकला पडल्याची माहिती त्यांचा मुलगा संदीप यांना मिळाली.

त्यानंतर चंद्रकला यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारांपूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती पोलीस, तसेच महावितरणच्या अधिकाऱ्यांना कळविण्यात आली. महावितरणच्या तंत्रज्ञांनी घटनास्थळी धाव घेतली. वीज पुरवठा खंडीत करण्यात आला. महावितरणच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळाची पाहणी केली. याप्रकरणी पोलिसांकडून महावितरणला अहवाल सादर करण्यात येणार आहे. त्यानंतर संबंधितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

pune Pedestrian killed
पुणे: ॲम्ब्युलन्सच्या धडकेत पादचाऱ्याचा मृत्यू; चालकाने मद्यप्राशन केल्याचे उघड
Girl dies after being hit by a Citylink bus in nashik
सिटीलिंक बसच्या धडकेने बालिकेचा मृत्यू, आजोबा जखमी
Pune Hit and Run Two on-duty policeman hit by speeding car
पुणे हिट अँड रन: ऑनड्युटी असलेल्या दोघांना भरधाव कारने उडवलं; पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू, एक गंभीर
Nashik, Woman Dies in Surgana, Woman Dies in Surgana tehsil due to Flood, Farmers Await Heavy Rains for Sowing in nashik, rain, monsoon, rain in nashik, nashik farmers, nashik news,
नाशिक : सुरगाण्यात पुरात वाहून गेल्याने महिलेचा मृत्यू, घाटमाथ्यावर पावसाची हजेरी
21 newborns die a kalwa hospital during a month
महिनाभरात २१ नवजात बालकांचा मृत्यू; बालकांचे वजन कमी असल्याचा कळवा रुग्णालय प्रशासनाचा दावा
buffalo 24 buffaloes got electrocuted and died on the spot
ओढ्यात उतरलेल्या २४ म्हशींचा विजेचा धक्का बसून जागीच मृत्यू
Gadchiroli, Death, child,
गडचिरोलीत आरोग्य व्यवस्थेचे धिंडवडे; उपचाराअभावी ४ वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू, रुग्णवाहिका वेळेत…
pune police officers suspended marathi news
फर्ग्युसन रस्त्यावरील पबमध्ये अमली पदार्थांचे सेवन प्रकरण : शिवाजीनगर पोलीस ठाण्यातील वरिष्ठ निरीक्षकासह तीन अधिकारी निलंबित

हेही वाचा…पुणे : आरोपी अल्पवयीन मुलाचा बालसुधारगृहातच मुक्काम, बाल न्याय मंडळाचा आदेश; कल्याणीनगर अपघात प्रकरण

बेजबाबदारपणाचा दुसरा बळी

गेल्या महिन्यात हडपसर भागात पाऊस झाला. त्यावेळी तेथे साचलेल्या पाण्यात विद्युत प्रवाह उतरला होता. साचलेल्या पाण्यातून निघालेल्या शाळकरी मुलाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झाला होता. बालेवाडी भागात उघड्यावर पडलेल्या विद्युत वाहिनीतून विजेचा धक्का बसल्याने चंद्रकला मिरदुडे यांचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी घडली. महावितरणच्या बेजबाबदारपणामुळे दुर्घटना घडल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.