Premium

मराठा, धनगर समाजाच्या आरक्षणाबाबत अजित पवार म्हणाले, ‘महायुती सरकार…’

इतर आरक्षणाला कोणताच धक्का न लागता कायद्याच्या चौकटीत निर्णय घेण्याचा प्रयत्न चालू असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.

ajit pawar on maratha reservation, ajit pawar on dhangar reservation, ajit pawar on muslim reservation
मराठा, धनगर समाजाच्या आरक्षणाबाबत अजित पवार म्हणाले, 'महायुती सरकार…' (संग्रहित छायाचित्र)

पिंपरी : मराठा, धनगर समाजाच्या आरक्षणाबाबत सरकार सकारात्मक आहे. इतर आरक्षणाला कोणताच धक्का न लागता कायद्याच्या चौकटीत निर्णय घेण्याचा प्रयत्न चालू असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले. उपमुख्यमंत्री पवार रविवारी शहर दौऱ्यावर होते. निगडी येथील शरदनगर आणि दुर्गानगरच्या ६७० झोपडीधारक सभासदांच्या पुनर्वसन प्रकल्पाला भेट दिली. आमदार अण्णा बनसोडे, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे यावेळी उपस्थित होते. पवार हे दिवसभर शहरातील ४५ सार्वजनिक गणेश मंडळांना भेटी देणार आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा : “अपात्रतेबाबतच्या कारवाईसाठी लागेल तेवढा वेळ घेणार”, नार्वेकरांच्या वक्तव्यावर असीम सरोदे म्हणाले…

मराठा, धनगर समाजाच्या आरक्षणाबाबत सरकार सकारात्मक असून इतर आरक्षणाला कोणताच धक्का न लागता कायद्याच्या चौकटीत निर्णय घेण्याचा प्रयत्न चालू आहे. तत्कालीन काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी सरकारने मराठा समाजाला आरक्षण दिले. पण, ते उच्च न्यायालयात टिकले नाही. त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने आरक्षणाचा निर्णय घेतला. तो निर्णय उच्च न्यायालयात टिकला पण सर्वोच्च न्यायालयात टिकला नाही. न्यायालयाने दिलेल्या निकालानुसार घटनेच्या तरतुदीत टिकेल, असे आरक्षण देण्यास महायुतीचे सरकार कटिबद्ध आहे. मुस्लिम समाजालाही न्याय दिला पाहिजे. त्या उद्देशाने त्यांच्या प्रश्नांबाबत आढावा घेतला. त्यांच्या आरक्षणाबाबत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार असल्याचेही पवार यांनी सांगितले.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: In pune deputy cm ajit pawar gives statement on dhangar muslim and maratha reservation pune print news ggy 03 css

First published on: 24-09-2023 at 15:50 IST
Next Story
पिंपरी ते निगडी मेट्रो विस्तारीकरणाबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, ‘एका मंत्र्यांच्या स्वाक्षरीमुळे मार्ग रखडला…’