पुणे : पुणे लोकसभा मतदार संघातील सहकारनगर, शिवदर्शन भागात पैसे वाटपाचा आरोप करून काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी रविवारी रात्री सहकारनगर पोलीस ठाण्यात ठिय्या आंदोलन केले. काँग्रेस आणि भाजपच्या कार्यकर्त्यांनी वस्ती भागात पैसे वाटप करण्यात आल्याचे आरोप केले. तर भाजपचे शहराध्यक्ष धीरज घाटे यांनी पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांना निवेदन दिले. धंगेकरांनी पैसे वाटप केल्याचा आरोप घाटे यांनी केला आहे.

पुणे लोकसभा मतदारसंघातील प्रचाराची सांगता शनिवारी झाली. रविवारी रात्री शहराच्या वेगवेगळ्या भागात पैसे वाटप करण्यात आल्याचा आरोप भारतीय जनता पक्ष आणि काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केले. मतदानाच्या पार्श्वभूमीवर शहरात कडक बंदोबस्त तैनात असताना पैसे वाटप करण्यात आल्याचा आरोप-प्रत्यारोप करण्यात आले. शिवदर्शन, सहकारनगर भागात मोठ्या प्रमाणावर पैसे वाटप होत असल्याचा आरोप धंगेकर यांनी केला.

BJP MLA are worried about Congress increasing voter in loksabha election
काँग्रेसला सुगीचे दिवस! मताधिक्य घटल्याने भाजप आमदार चिंतेत, मात्र काँग्रेसमध्ये…
money, Congress district president,
“लोकसभा निवडणुकीत काँग्रेस जिल्हाध्यक्षांना सुपारी देण्याचा प्रयत्न,” प्रतिभा धानोरकर यांचा आरोप
bjp absent in meeting of new mps in thane
ठाण्यात नव्या खासदारांच्या बैठकीला भाजपची दांडी
Nandurbar lok sabha seat, Newly Elected MP Adv Gowaal Padavi, new leader of Tribal Community , Adv Gowaal Padavi political journey, gowaal padvi, sattakaran article,
ओळख नवीन खासदारांची : ॲड. गोवाल पाडवी (नंदुरबार, काँग्रेस) ; आदिवासींमधील नवीन नेतृत्व
Controversy in Nashik Teacher Constituency Election candidate beaten up
नामसाधर्म्य असलेल्या प्रतिस्पर्धी उमेदवाराला मारहाण; नाशिक शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीला वादाचे ग्रहण
bhandara gondia lok sabha marathi news
भंडारा : भाजपनेच भाजप उमेदवाराला तोंडघशी पाडले, आगामी विधानसभेसाठी धोक्याची घंटा
Gadchiroli, Congress, leading,
गडचिरोली : सहाही विधानसभा क्षेत्रात काँग्रेसला आघाडी, भाजप आमदारांच्या सुमार कामगिरीची सर्वत्र चर्चा
Ramdas Tadas, ​​Amar Kale,
मोर्शीसह वर्धेने युतीची तर आर्वी, हिंगणघाट, धामणगाव, देवळीने राखली आघाडीची लाज

हेही वाचा…मावळ : मतदान केंद्रावर पोहोचण्यासाठी मतदान कर्मचाऱ्यांचा बोटीतून प्रवास

त्यानंतर धंगेकर रात्री सहकारनगर पोलीस ठाण्यात गेले. त्यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना जाब विचारला. पोलीस ठाण्याच्या आवारात धंगेकर आणि कार्यकर्त्यांनी ठिय्या आंदोलन केले. पैसे वाटप करण्यांविरुद्ध कारवाई करण्याची मागणी केली. भाजपच्या कार्यकर्त्यांना पोलीस पाठीशी घालत असल्याचा आरोप धंगेकर यांनी केला आहे.