पुणे : हडपसर भागातील अमनोरा पार्क परिसरातील एका सोसायटीत असलेल्या सदनिकेत रविवारी दुपारी आग लागली. सदनिका बंद असल्याने गंभीर दुर्घटना टळली. सदनिकेतील गृहोपयोगी साहित्य जळाले. अमनोरा पार्क परिसरात मागील बाजूस सॉलिटियर वाधवा अकरा मजली इमारत आहे. या इमारतीतील एका सदनिकेत आग लागल्याची माहिती रविवारी दुपारी अग्निशमन दलाला मिळाली. त्यानंतर अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली.

इमारतीतील दुसऱ्या मजल्यावर असलेल्या सदनिका क्रमांक चारमध्ये आग लागल्याचे निदर्शनास आले. सदनिका बंद होती. या घटनेची माहिती सदनिका मालकाला कळविण्यात आली. चावीने दरवाजा उघडण्यात आला. तेव्हा सदनिकेत मोठ्या प्रमाणावर धूर झाल्याचे आढळून आले. सदनिकेत कोणी नसल्याची खात्री करून जवानांनी पाण्याचा मारा केला.

Pimpri, police died, police hit by vehicle,
पिंपरी : कर्तव्यावर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याचा अज्ञात वाहनाने धडक दिल्याने मृत्यू
Dead ants found in samosas
किळसवाणा प्रकार! कुरकुरीत समोस्यामध्ये आढळल्या मेलेल्या मुंग्या; दिल्ली विद्यापीठाच्या कॅन्टीनमधील Video Viral
two injured including a woman in fire incidents fire broke out at three places in pune city
मुंढव्यात बंगल्यात आग; महिलेसह दोघे जखमी – शहरात तीन ठिकाणी आग
Thief snatches mangalsutra of woman when she was busy in making reels
धक्कादायक! भरदिवसा रस्त्यावर रिल करणाऱ्या महिलेच्या गळ्यातील मंगळसुत्र चोरट्यांनी नेले ओढून, Video व्हायरल

हेही वाचा…पुणे : पिस्तूल बाळगणारा तडीपार गुंड अटकेत

सदनिकेतील आगीची झळ शेजारी असलेल्या सदनिकेला न पोहोचण्यासाठी जवानांनी काळजी घेतली. अग्निशमन दलाचे अधिकारी अनिल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली तांडेल अंबादास दराडे, निलेश भोसले, चंद्रकांत जगताप, दत्तात्रय माने, प्रदीप सावंत, वैभव भोसले, अनिल हाके, घुले यांनी पाण्याचा मारा करून अर्ध्या तासात आग आटोक्यात आणली. आगीत सदनिकेतील गृहोपयोगी साहित्य जळाले. शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याची शक्यता अग्निशमन दलाच्या जवानांनी व्यक्त केली. शनिवारी मार्केट यार्ड भागातील गंगाधाम फेज दोनमधील सदनिकेत आग लागली होती. जवानांनी एकाच कुटुंबातील पाच जणांची सुटका केल्याने गंभीर दुर्घटना टळली.