पुणे : चारित्र्याच्या संशयावरुन एकाने पत्नीच्या डोक्यात सिलिंडर घालून खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना विश्रांतवाडीतील धानोरी भागात मध्यरात्री घडली. याप्रकरणी पाेलिसांनी पतीला ताब्यात घेतले आहे. माधुरी मनोहर मोरे (वय ४७, रा. मुंजाबा वस्ती, धानाेरी, विश्रांतवाडी) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे, याप्रकरणी पती मनोहर मोरे याला ताब्यात घेण्यात आले आहे. मोरे दाम्पत्य धानोरीतील मुंजाबा वस्ती परिसरात राहायला आहे. गेल्या काही महिन्यांपासून मनोहर हा माधुरी यांच्या चारित्र्याचा संशय घेऊन त्यांचा छळ करत होता. त्यांना मारहाण करायचा. रविवारी मध्यरात्री मोरे दाम्पत्यात पुन्हा वाद झाला. मनोहरने स्वयंपाकघरातील गॅस सिलिंडरची टाकी माधुरी यांच्या डोक्यात मारली. डोक्यावर वर्मी घाव बसल्याने त्या रक्ताच्या थारोळ्यात कोसळल्या. गंभीर जखमी झालेल्या माधुरी यांचा जागीच मृत्यू झाला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा : पेट्रोल पंपचालकांचा उद्यापासून बेमुदत बंद.‌.‌. काय आहे कारण?

सोमवारी सकाळी हा प्रकार उघडकीस आल्यानंतर परिमंडळ चारचे पोलीस उपायुक्त हिंमत जाधव, विश्रांतवाडी पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक कांचन जाधव यांनी घटनास्थळी धाव घेतली. मृतदेह शवविच्छेदनासाठी ससून रुग्णालयात पाठविण्यात आला असून, पती मनोहरला अटक करण्यात आली, अशी माहिती पोलीस उपायुक्त जाधव यांनी दिली.