पुणे : माथाडी कायद्याची राज्यभरात काटेकोरपणे अंमलबजावणी करावी, तसेच बाजार समितीचे केंद्रीकरण करणारे २०१८ चे विधेयक (राष्ट्रीय दर्जा बाजार समिती बनविणे) मागे घेण्यात यावे, या मागणीसाठी श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्डातील कामगार संघटनांनी सोमवारी बंद पाळला. बंदमुळे मार्केट यार्डात शुकशुकाट असल्याचे पाहायला मिळाले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

राज्यभरातील कामगार संघटनांनी सोमवारी बंद पाळला. राज्यातील बहुतांश बाजार समितीच्या आवारात शेतीमालाची आवक झाली नाही. परराज्यांतील शेतीमालाची आवक सोमवारी झाली. मात्र, पुणे विभागातील शेतकऱ्यांनी शेतीमाल विक्रीस पाठविला नाही. बंदमध्ये श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्डातील कामगार संघटना सहभागी झाल्या होत्या, अशी माहिती श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्ड कामगार युनियनचे अध्यक्ष संतोष नांगरे यांनी दिली.

हेही वाचा : मोठी बातमी : शिक्षक भरती प्रक्रियेत झाली उमेदवारांची शिफारस

माथाडी कायदा मोडीत काढण्यासाठी माथाडी विधेयक मांडण्यात आलेले आहे. संबंधित विधेयक मागे घेण्यात यावे. माथाडी मंडळात कामगारांच्या मुलांना प्राधान्याने नोकरी द्यावी, तसेच लोकशाही पद्धतीने व्यवस्थित बाजार समित्या सुरू आहेत. त्यांचे केंद्रीकरण करण्याची गरज नसल्याचे कामगार संघटनांकडून दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In pune market yard bandh for the demand of implementation of mathadi act pune print news rbk 25 css
First published on: 26-02-2024 at 11:16 IST