पुणे : रंगकाम करणाऱ्या कामगार शिडीवरुन तोल जाऊन पडल्याने त्याचा मृत्यू झाल्याची घटना वडगाव शेरी भागातील घटना घडली. सुरक्षाविषयक उपायोजना न करता कामगाराच्या मृत्यूस जबाबदार ठरल्याप्रकरणी ठेकेदाराविरुद्ध चंदननगर पाेलिसांनी गुन्हा दाखल केला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अमरनाथ भागीरथी भारती (वय ५४, रा. उत्तमनगर) असे मृत्युमुखी पडलेल्या कामगाराचे नाव आहे. याप्रकरणी ठेकेदाराविरुद्ध गु्न्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलीस शिपाई महेश भोंगळे यांनी चंदननगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

हेही वाचा : पुणे : नायलॉन मांजा विक्री करणारी महिला ताब्यात, संक्रातीत पतंगबाजीसाठी छुप्या पद्धतीने मांजा विक्रीचा प्रकार उघड

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वडगाव शेरीतील परफेक्ट बाऊंटीफोर इमारतीच्या रंगरंगोटीचे काम सुरू आहे. तेथे अमरनाथ हे रंगकाम करत होते. गुरुवारी (९ जानेवारी) इमारतीत काम करताना शिडीवरुन तोल जाऊन पडल्याने अमरनाथ यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. गंभीर जखमी झालेल्या अमरनाथ यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. सुरक्षाविषयक उपाययोजना न केल्याने ही दुर्घटना घडली. याप्रकणी ठेकेदाराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. चंदननगर पोलिसांकडून याप्रकरणाचा तपास करण्यात येत आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In pune painter died after fall from the ladder case against contractor pune print news rbk 25 css