पुणे : घाऊक बाजारात गेल्या आठवड्याच्या तुलनेत फळभाज्यांची आवक वाढल्याने बहुतांश फळभाज्यांच्या दरात घट झाली. मागणी वाढल्याने टोमॅटो, ढोबळी मिरची, शेवग्याच्या दरात वाढ झाल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली.

गुलटेकडी येथील श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्डात रविवारी (४ फेब्रुवारी) राज्य, तसेच परराज्यांतून १०० ट्रक फळभाज्यांची आवक झाली. गेल्या आठवड्यात ९० ट्रक फळभाज्यांची आवक झाली होती. कर्नाटक, गुजरात, आंध्र प्रदेशातून ८ ते १० टेम्पो हिरवी मिरची, कर्नाटक, गुजरातमधून मिळून ३ ते ४ टेम्पो कोबी, आंध्र प्रदेश आणि तमिळनाडूतून ३ ते ४ टेम्पो शेवगा, कर्नाटकातून ३ ते ४ टेम्पो घेवडा, २ ते ३ टेम्पो पावटा, मध्यप्रदेश आणि राजस्थानमधून १५ ते १६ टेम्पो मटार, राजस्थानातून ११ ते १२ टेम्पो गाजर,मध्य प्रदेशमधून ६ टेम्पो लसूण, आग्रा, इंदूर, तसेच पुणे विभागातून मिळून ५० ट्रक बटाट्याची आवक झाली, अशी माहिती घाऊक बाजारातील प्रमुख अडते विलास भुजबळ यांनी दिली.

Kolhapur Police arrest gang selling fake notes
बनावट नोटांची छपाई, विक्री करणारी टोळी कोल्हापूर पोलिसांच्या ताब्यात; म्होरक्याचे नेत्यांशी लागेबांधे असल्याची चर्चा
baba kalyani s niece nephew move court over property dispute
भारत फोर्जचे अध्यक्ष बाबा कल्याणी यांच्या कुटुंबीयांत संपत्तीचा वाद; कल्याणी यांच्या भाच्यांकडून दिवाणी न्यायालयात दावा
BRS in Maharashtra
अवघ्या काही महिन्यांतच ‘गुलाबी रंग’ उडाला, भारत राष्ट्र समितीचे राज्यातील अस्तित्वच धोक्यात
TB patients struggle with treatment
राज्यात एक महिना पुरेल इतकाच क्षयरोग औषधांचा साठा; स्थानिक पातळीवर औषधे खरेदी करण्याचे केंद्र सरकारचे राज्यांना आदेश

हेही वाचा…पुणे जिल्ह्याची ‘या’ क्षेत्रात विक्रमाची ‘हॅट्ट्रीक’

पुणे विभागातून सातारी आले ६०० ते ७०० गोणी, टोमॅटो ८ ते ९ हजार पेटी, भेंडी ५ ते ६ टेम्पो, गवार २ ते ३ टेम्पो, फ्लॉवर १० ते १२ टेम्पो, कोबी ५ ते ६ टेम्पो, हिरवी मिरची ४ ते ५ टेम्पो, पावटा ४ ते ५ टेम्पो, ढोबळी मिरची ८ ते १० टेम्पो, पावटा ५ ते ६ टेम्पो, तांबडा भोपळा १० ते १२ टेम्पो, शेवगा २ टेम्पो, घेवडा ५ ते ६ टेम्पो, कांदा १०० ट्रक अशी आवक झाली.