पुणे: महाविकास आघाडीचे उमेदवार अमोल कोल्हे यांच्या टीकेला शिवाजी आढळराव पाटील यांनी प्रतिउत्तर दिलं आहे. अमोल कोल्हे यांच्यामध्येच मी पणा ठासून भरला आहे. त्यामुळेच ते अजित पवारांसह इतरांवर टीका करतात, असं प्रत्युत्तर शिवाजी आढळराव पाटील यांनी खासदार अमोल कोल्हे यांना दिलं आहे. शिवाजी आढळराव पाटील हे पिंपरी- चिंचवडमध्ये पत्रकारांशी बोलत होते.

हेही वाचा : छगन भुजबळांसाठी समता परिषद सरसावली… घेतला ‘हा’ निर्णय

शिवाजी आढळराव पाटील म्हणाले, मी कधी थांबायचं हा माझा प्रश्न आहे. मी थांबू नये असा अमोल कोल्हेंचा आग्रह असेल तर आणखी चार निवडणूक लढवतो, असा टोला आढळराव यांनी लगावला. पुढे ते म्हणाले, अमोल कोल्हे हेच माझ्या बोलण्यावरून भावनिक झाले असतील तर मी पुन्हा लढेन. अमोल कोल्हे हे स्क्रिप्ट प्रमाणे बोलतात. त्यांना कोण लिहून देतं हे मात्र मला माहीत नाही. अमोल कोल्हेंमध्ये ‘मी’ पणा ठासून भरला आहे. अजित पवारांवर टीका, इतरांवर टीका असं त्यांचं काम सुरू आहे. हा त्यांचा ‘मी’ पणा आहे. हे निवडणूक हातातून निसटल्याचं चिन्ह आहे, असं शिवाजी आढळराव पाटील म्हणाले आहेत.