scorecardresearch

Premium

महिलेला धमकावून विनयभंग; माजी मंत्री बाळासाहेब शिवरकर यांच्या मुलाविरूद्ध गुन्हा

शिवरकर आणि गायकवाड यांनी महिलेला शिवीगाळ केली. त्यांना जागेच्या परिसरातून हाकलून लावले. पुन्हा या परिसरात दिसल्यास जीवे मारु, अशी धमकी दिली.

son of former minister harassed woman, former minister balasaheb shivrkar
महिलेला धमकावून विनयभंग; माजी मंत्री बाळासाहेब शिवरकर यांच्या मुलाविरूद्ध गुन्हा (संग्रहित छायाचित्र)

पुणे : कुंपणाच्या वादातून जमीन मालक महिलेला धमकावून तिचा विनयभंग केल्याच्या आरोपावरुन माजी मंत्री बाळासाहेब शिवरकर यांचा मुलगा माजी नगरसेवक अभिजित शिवरकर यांच्यासह १५ जणांविरुद्ध वानवडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला. याप्रकरणी अभिजीत बाळासाहेब शिवरकर, भास्कर रत्नाकर गायकवाड, त्यांची पत्नी, मुलगा, राजेश खैरालिया, किरण छेत्री (रा. वानवडी गाव) यांच्यासह दहाजणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत एका महिलेने वानवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

हेही वाचा : लग्नाचे आमिष दाखवून शारीरिक संबंध आणि तरुणी गर्भवती होताच…

devendra fadnavis obc protest withdraw
ओबीसी आंदोलन मागे; देवेंद्र फडणवीस म्हणाले, “मराठ्यांना आरक्षण देण्याची भूमिका आहे, पण…”
maharashtra agriculture minister dhananjay munde praise union minister nitin gadkari in event at akola
अकोला: नितीन गडकरींमुळेच मी कृषीमंत्री; धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने भुवया उंचावल्या
bjp mp ramesh bidhuri video loksabha
Video: “ए भ**, दहशतवादी..बाहेर फेका याला”, भाजपा खासदाराची लोकसभेत शिवीगाळ; राजनाथ सिंहांनी मागितली माफी!
What Manoj Jarange Patil Said?
मनोज जरांगे पाटील यांच्या सरकारकडे ‘या’ पाच मागण्या आणि दिला इशारा, म्हणाले..

वानवडीतील महात्मा फुले सांस्कृतिक भवन परिसरात महिलेची वडिलोपार्जित जागा आहे. फिर्यादी महिला वारस आहेत. त्यांनी भूमापन अधिकाऱ्याकडून सरकारी मोजणी केली होती. त्याठिकाणी कुंपण घालण्याचे काम सुरू होते. त्यावेळी शिवरकर यांनी कामगारांना रोखले. लोखंडी खांब काढून टाकले. आम्ही जमीन मालक आहोत, असे सांगून शिवरकर आणि गायकवाड यांनी महिलेला शिवीगाळ केली. त्यांना जागेच्या परिसरातून हाकलून लावले. पुन्हा या परिसरात दिसल्यास जीवे मारु, अशी धमकी दिली.

Latest Comment
View All Comments
Post Comment

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: In pune son of former minister balasaheb shivrkar booked for harassing a woman pune print news rbk 25 css

First published on: 23-09-2023 at 17:59 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×