पुणे : शहरात वेगवेगळ्या भागात घरफोडी, सहा लाखांचा ऐवज लांबविला

वारजे आणि हडपसर भागात या घटना घडल्या.

पुणे : शहरात वेगवेगळ्या भागात घरफोडी, सहा लाखांचा ऐवज लांबविला
पुणे : शहरात वेगवेगळ्या भागात घरफोडी, सहा लाखांचा ऐवज लांबविला

पुणे : शहराच्या वेगवेगळ्या भागात सोसायटीतील सदनिकांचे कुलुप तोडून चोरट्यांनी सहा लाख रुपयांचा ऐवज लांबविला. वारजे आणि हडपसर भागात या घटना घडल्या. याबाबत चिराग पवळे (वय ३९, रा. वारजे) यांनी वारजे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पवळे वारजे गावठाणातील एका सोसायटीत राहायला आहेत. चोरट्यांनी पवळे यांच्या सदनिकेचे कुलुप तोडले. शयनगृहातील कपाट उचकटून चोरट्यांनी कपाटातील दोन लाख ५८ हजारांचे दागिने लांबिवले. सदनिकेत चोरी झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी पोलिसांकडे तक्रार दिली. पोलीस उपनिरीक्षक मुंढे तपास करत आहेत.

हडपसरमधील भेकराईनगर परिसरात असलेल्या त्रिमूर्ती विहार सोसायटीतील सदनिकेचे कुलुप तोडून चोरट्यांनी कपाटातील तीन लाख ४७ हजारांचे दागिने लांबविले. याबाबत विशाल मोहिते (वय ३९) यांनी हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. मोहिते यांच्या सदनिकेचे कुलुप चोरट्यांनी तोडून कपाटातील सोन्याचे दागिने लांबविले. सहायक पोलीस निरीक्षक शिंदे तपास करत आहेत. .

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: In pune theft of 6 lakh rupees registered at different places pune print news asj

Next Story
पुणे : अमृतमहोत्सवी स्वातंत्र्यदिन उत्साहात ; दोन वर्षांनी सामुदायिक ध्वजारोहण करण्याची संधी
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी