पुणे : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणात मुबलक पाणीसाठा असताना आणि दुसऱ्या बाजूला नदीपात्रात विसर्ग करण्यात आला असतानाही शहराच्या काही भागाला पाण्यासाठी टँकरवर अवलंबून रहावे लागत असल्याची वस्तुस्थिती पुढे आली आहे. एरंडवणा भागाबरोबरच उपनगरांमध्येही टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे.

दरम्यान, महापालिकेने मात्र पुरेसा आणि नियमित पाणीपुरवठा होत असल्याचा दावा केला आहे. शहर आणि धरण साखळी प्रकल्पात गेल्या पंधरा दिवसांपासून जोरदार पाऊस झाला आहे. त्यामुळे पाणीपुरवठा करणारी धरणे जवळपास शंभर टक्के भरली असून, खडकवसाला धरणातून विसर्गही करण्यात आला आहे. मात्र शहराच्या मध्यवर्ती भागासह उपनगरात ऐन पावसाळ्यातही पाण्यासाठी टँकरवर अवलंबून रहावे लागत आहे. एरंडवणा येथील काही सोसायट्यांकडून पाण्याचे टँकर मागविले जात आहेत.

woman self help groups marathi news
यंदाचा गणेशोत्सव बचत गटांसाठी आर्थिक फलदायी, विविध वस्तू आणि खाद्यपदार्थ विक्रीतून १५ लाखांहून अधिकची आर्थिक उलाढाल
15th September Rashi Bhavishya & Marathi Panchang
१५ सप्टेंबर पंचांग: आनंदाची वार्ता ते प्रेम, मैत्रीची साथ; १२ पैकी कोणत्या राशीचा हसत-खेळत जाणार रविवार; वाचा तुमचे राशिभविष्य
thane traffic marathi news
ठाणे: विसर्जन सोहळ्यासाठी पोलीस यंत्रणा सज्ज, शहरात वाहतूक बदल
Water supply Andheri, Water supply jogeshwari,
सोमवारी अंधेरी, जोगेश्वरीत अर्धा दिवस पाणीपुरवठा बंद
Water supply disrupted in Pune city due to interrupted power supply Pune
खंडित वीजपुरवठ्यामुळे पाणीपुरवठा विस्कळीत; महावितरणपुढे महापालिका हतबल
tap water Water cut off in some parts of Thane on Wednesday x
ठाण्याच्या काही भागात बुधवारी पाणी नाही; पाणी नियोजनामुळे २४ ऐवजी १२ तासांचे पाणी बंद
pimpri chinchwad get water supply on alternate day despite pavana dam overflow
पिंपरी : पवना धरण काठोकाठ भरुनही पाणीपुरवठा दिवसाआडच; काय आहे नेमके कारण?
Andheri to Dadar and Bhandup affected as Tansa water channel burst
तानसा जलवाहिनी फुटली; अंधेरी ते दादर आणि भांडुपला फटका

हेही वाचा : समीक्षा संमेलनाच्या अध्यक्षपदी प्रा. अविनाश सप्रे यांची निवड

गेल्या वर्षी समाधानकारक पाऊस न झाल्याने पुण्यावर पाणीटंचाईचे सावट होते. त्यातच उन्हाच्या वाढत्या झळांमुळे पिण्याच्या पाण्याच्या मागणीत मोठी वाढ झाली होती. त्यामुळे फेब्रुवारी महिन्यापासूनच टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याची वेळी महापालिका प्रशासनावर आली होती. मार्चपासून ही मागणी वाढल्याचेही आकडेवारीवरून निदर्शनास आले होते. यावेळी समाधानकारक पाऊस झाल्याने धरणे भरली आहेत. त्यामुळे पाणीपुरवठाही सुरळीत असल्याचा दावा पाणीपुरवठा विभागाकडून करण्यात आला आहे. काही भागांत तांत्रिक कारणांमुळे पाणीपुरवठा होत नसल्याने टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जातो. मात्र, तशा तक्रारी अपवादानेच आल्या आहेत. समाविष्ट भागात काही ठिकाणी टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. मात्र त्याची कारणे वेगळी आहेत, असा दावा महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून करण्यात आला आहे.

हेही वाचा : आचार्य अत्रे सव्वाशेव्या जयंती वर्षाच्या सांगतेनिमित्त चित्रपट महोत्सव, विशेष पुरस्कार वितरण

शहराला दोन वेळा पाणीपुरवठा करावा

खडकवासला धरणात पुरेसा पाणीसाठा असल्याने शहराला दोन वेळा पाणीपुरवठा करावा, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते नरेंद्र मते यांनी महापालिका आयुक्त, प्रशासक डाॅ. राजेंद्र भोसले यांच्याकडे केली आहे. यासंदर्भातील निवेदन मते यांनी आयुक्त डाॅ. भोसले यांना दिले आहे. खडकवासला धरण साखळी प्रकल्पात मुसळधार पाऊस सुरू असल्याने सध्या मुठा नदीपात्रात विसर्ग सुरू आहे. मात्र ऐन पावसाळ्यात शहराच्या काही गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये पाण्याचे टँकर मागवावे लागत आहे, ही वस्तुस्थिती आहे. पाऊसही मुबलक असला तरी शहरात आणि विशेषत: उपनगरांमध्ये पाणीपुरवठ्यासाठी टँकर उपलब्ध करून द्यावे लागत आहेत. ही बाब लक्षात घेऊन शहराला सकाळ आणि संध्याकाळ पाणीपुरवठा करण्यात यावा किंवा सकाळच्या पाणीपुरवठ्याची वेळ वाढविण्यात यावी, असे या निवेदनात मते यांनी नमूद केले आहे.