पिंपरी- चिंचवड: आरोपीला पकडण्यासाठी गेलेल्या पोलीस अधिकाऱ्यांच्या अंगावर गाडी घालून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना समोर आली आहे. हा सर्व थरार सीसीटीव्हीत कैद झाला आहे. याप्रकरणी जयपूर येथील स्थानिक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पिंपरी- चिंचवड सायबरचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण स्वामी हे जखमी झाले आहेत. त्यांच्या पायाला मुका मार लागला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चिंचवड मध्ये पोलीस अटक करतील अशी भीती दाखवून एक कोटी आठ लाख रुपयांची फसवणूक केलेला आरोपी अक्षत गोयलला पकडण्यासाठी सायबर टीम राजस्थान मधील जयपूर येथे रवाना झाली होती. मयांक गोयल हा अटक असून त्याच्या मदतीने अक्षत गोयलचा शोध सायबर पोलीस घेत आहेत. तो राजस्थानमधील जयपूर येथे असल्याची माहिती मयांककडून पोलिसांना मिळाली. सापळा रचून आरोपी अक्षत गोयलला पकडण्यासाठी सायबर पोलीस त्या ठिकाणी पोहोचले. अक्षत हा त्याच्या इतर मित्रांसह काळ्या चारचाकी गाडीत बसला होता.

How Files Help police to Solved Murder Mystery
Flies Helped Police : पोलिसांनी उडत्या माश्यांच्या मदतीने कसा लावला १९ वर्षीय आरोपीने केलेल्या हत्येचा छडा?
Todays Horoscope 9 November In Marathi
९ नोव्हेंबर पंचांग: कष्टाचे फळ, कुटुंबात गोडवा ते…
Accused in hit and run case in Ravet arrested Pune news
पिंपरी: रावेतमधील हिट अँड रन प्रकरण; चार दिवसांनी आरोपी अटकेत, ८० सीसीटीव्ही…
vehicle dragging police
संतापजनक! दोन वाहतूक पोलिसांना कारच्या बोनेटवरून फरफटत नेलं; दिल्लीतील घटना
Delhi crime News
Delhi : धक्कादायक! टोपीवरून झालेल्या वादातून तरुणाची गोळ्या झाडून हत्या; आरोपीच्या आईने पुरवली बंदूक
man murdered colleague over dispute on food cooking
जेवण बनवण्यावरून वाद; लोखंडी रॉडनी ११ घाव घालून केली हत्या, पिंपरीतील घटना
Man Assaults Woman In Greater Noida
VIDEO : केस पकडले, कानशीलात लगावल्या; तरुणाची भररस्त्यात मैत्रिणीला मारहाण
In Kendur village cousin was nearly crushed under car over land dispute
Video : जमिनीच्या वादातून चुलत भावाला मोटारीखाली चिरडण्याचा प्रयत्न, शिरुरमधील केंदूर गावातील घटना

हेही वाचा : Pimpri Crime News: विकृतीचा कळस! ८५ वर्षीय महिलेवर २३ वर्षीय इसमाकडून बलात्कार

पोलिसांनी त्या गाडीला घेरून अक्षत आणि त्याच्या मित्रांना खाली उतरण्यास सांगितले. परंतु, थेट गाडी सुरू करून अक्षतने पळून जाण्याचा प्रयत्न केला. त्याला अडवण्यासाठी गाडीपुढे थांबलेल्या सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रवीण स्वामी यांच्या अंगावर गाडी घालून अक्षत पळून गेला. घटनेनंतर स्थानिक पोलीस ठाण्यात स्वामी यांनी सरकारी कामात अडथळा आणल्या प्रकरणी आणि जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी आरोपी अक्षतवर गुन्हा दाखल केला आहे.