पुणे : खासदार संजय राऊत यांना लॉरेन्स बिष्णोई या कुख्यात टोळीच्या नावाने धमकीचा संदेश आला होता. या प्रकरणात पुणे गुन्हे शाखेने एका संशयित आरोपीला ताब्यात घेऊन मुंबई पोलिसांच्या ताब्यात दिले. राहुल तळेकर (रा. वडगाव शेरी) असे संशयित आरोपीचे नाव असून, पुणे पोलिसांनी त्यास पुढील तपासाकरिता मुंबई पोलिसांच्या ताब्यात दिल्याची माहिती गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त अमोल झेंडे यांनी शनिवारी दिली.

खासदार संजय राऊत यांना पंजाब, हरियाणामध्ये दहशत असलेल्या लॉरेन्स बिष्णोई टोळीकडून जीवे मारण्याचा धमकीचा संदेश पाठविण्यात आला होता. या प्रकरणात पोलिसांनी तपास सुरू केला होता. त्याचसोबत राऊत यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली होती. मुंबई पोलिसांना तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे काही धागेदोरे मिळाले होते. त्यानुसार एक संशयित पुण्यात असल्याची माहिती त्यांनी पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेस कळवली होती. त्यानुसार पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या पथकाने संबंधित आरोपीचा तपास करत खराडी चंदननगर परिसरातून एका हॉटेलमधून राहुल तळेकर याला ताब्यात घेतले.

chhota rajan marathi news, 213 burglary marathi news
कुख्यात डॉन छोटा राजनच्या घरासह, २१३ घरफोड्या करणाऱ्यास अटक
retired employees of KEM
केईएममधील सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे ठिय्या आंदोलन
Smuggling liquor, Delhi to Mumbai, State Excise Department, Seizes 205 Bottles, Foreign Liquor, Arrests one man, crime, marathi news,
दिल्लीवरून मुंबईत मद्याची तस्करी
Smuggling liquor, Delhi to Mumbai, State Excise Department, Seizes 205 Bottles, Foreign Liquor, Arrests one man, crime, marathi news,
दिल्लीवरून मुंबईत मद्याची तस्करी

हेही वाचा… तुम्ही बॅट पॅड घालून तयार… जितेंद्र आव्हाड यांची टीका

हेही वाचा… पुणे : भावी खासदार म्हणून भाजप शहराध्यक्षांची फलकबाजी

तळेकर हा एका हॉटेलमध्ये काम करतो. त्याने अशाप्रकारचे कृत्य कशासाठी केले आहे, तसेच त्याचा लॉरेन्स बिष्णोई टोळीशी नेमका काय संबंध आहे, याबाबतचा तपास पोलीस करत आहे. पुणे पोलिसांनी पुढील तपासासाठी त्याचा ताबा मुंबई पोलिसांना दिल्याची माहिती वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी दिली.

संजय राऊत यांच्या बंधूने केली होती तक्रार

कुख्यात गुंड लॉरेन्स बिष्णोई याच्या नावाने शुक्रवारी संजय राऊत यांच्या मोबाइलवर एक संदेश आला होता. या संदेशात संजय राऊत यांना ठार मारण्याची धमकी देण्यात आली होती. संजय राऊत यांनी याबाबत शुक्रवारी पोलिसांना माहिती दिली होती. संजय राऊत यांचे भाऊ आमदार सुनील राऊत यांनी शनिवारी सकाळी कांजूरमार्ग पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार दाखल केली होती. त्यानुसार पोलिसांनी तपास करून शनिवारी पुण्यातून राहुल उत्तम तळेकर (२३) याला अटक केली.

राहुलचा पुण्यात हॉटेल व्यवसाय

मूळचा जालना येथील रहिवासी असलेल्या राहुलचा पुण्यात हॉटेल व्यवसाय आहे. दारूच्या नशेत त्याने हा धमकीचा संदेश पाठवल्याची माहिती पोलिसांनी दिली. आरोपीने संजय राऊत यांना अनेक वेळा फोन केला. मात्र फोन न उचल्याने हा संदेश पाठवल्याचे त्याने चौकशीत कबूल केल्याचे पोलिसांनी सांगितले. अटक आरोपीचा कुठल्याही राजकीय पक्षाशी संबंध नाही. तसेच त्याची गुन्हेगारी पार्श्वभूमी नाही. त्याचा लॉरेन्स बिष्णोई टोळीशी काहीही संबंध नसल्याचे तपासात उघड झाले आहे, असे मुंबई ‘परिमंडळ ६’चे पोलीस उपायुक्त पुरुषोत्तम कराड यांनी सांगितले. असे असले तरी याप्रकरणी अधिक तपास करण्यात येत आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.