काम देण्याच्या बहाण्याने एका महिलेला हॉटेलमध्ये नेऊन तिच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावून नेल्याची घटना चऱ्होली परिसरात घडली. या प्रकरणी विश्रांतवाडी पोलिसांनी चोरट्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

याबाबत एका ५५ वर्षीय महिलेने फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला विश्रांतवाडी परिसरात घरकाम करतात. टिंगरेनगर परिसरातील एका घरी त्या सकाळी साडेनऊच्या सुमारास कामाला जात होत्या. त्या वेळी दुचाकीवरुन आलेल्या चोरट्याने त्यांना थांबविले. मी तुमच्या मुलाचा मित्र आहे. मी तुम्हाला एक काम मिळवून देतो, असे दुचाकीस्वार चोरट्याने त्यांना सांगितले.
त्यानंतर चोरटा महिलेला दुचाकीवर घेऊन आळंदी रस्त्यावरील चऱ्होली परिसरात गेला. तेथील एका हॉटेलमधील खोलीत महिलेला नेले. याच हॉटेलमध्ये काम असल्याची बतावणी चोरट्याने केली. महिलेला धमकावून तिच्या गळ्यातील एक लाखांचे मंगळसूत्र हिसकावून चोरटा पसार झाला. घाबरलेल्या महिलेने पोलिसांकडे तक्रार दिली असून सहायक निरीक्षक सचिन निकम तपास करत आहेत. पोलिसांनी हॉटेलमधील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांनी केलेले चित्रीकरण ताब्यात घेतले असून चोरट्याचा शोध घेण्यात येत आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Incident hotel alandi road woman robbed under pretext getting a job police crime amy
First published on: 17-05-2022 at 16:32 IST