मित्राची वाट पहात थांबलेल्या शालेय विद्यार्थ्यावर सराईत गुन्हेगार आणि त्याच्या साथीदारांनी जीवघेणा हल्ला केला. कोथरुड येथील भेलकेनगर चौकात रात्री ही घटना घडली.कोथरुड पोलिसांनी याप्रकरणी एका सराईत गुन्हेगाराला अटक केली आहे.विजय उर्फ सोनू बबन म्हस्के (वय २८,रा. भेलके चाळ, कोथरुड ) असे अटक करण्यात आलेल्या आराेपीचे नाव आहे. त्याच्याविराेधात शिवणे येथील एका सोळा वर्षांच्या मुलाने दिलेल्या तक्रारीनुसार जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा >>>पुणे: जिल्ह्यातील सर्व तालुक्यांचे जलधर आराखडे; भूजल व्यवस्थापन आराखडा जिल्हाधिकाऱ्यांना सादर

chhota rajan marathi news, 213 burglary marathi news
कुख्यात डॉन छोटा राजनच्या घरासह, २१३ घरफोड्या करणाऱ्यास अटक
Police raid on Dancers obscene dance in bungalow at lonawala
लोणावळा: बंगल्यात सुरू होता नृत्यांगनाचा अश्लील नाच; पोलिसांनी टाकला छापा
pune, fergusson college, holi, boy, throwing water, balloons, pedestrians, arrested, police,
होळीच्या दिवशी रस्त्यावर फुगे मारणारी हुल्लडबाज मुले ताब्यात; पोलिसांकडून पालकांवर गुन्हे
Solapur, Moneylender, Hires Hitmen, firing on Businessman, Recover Overdue Loan, crime news, marathi news, police,
सोलापूर : कर्जवसुलीसाठी व्यापाऱ्यावर गोळीबार; सावकाराने सुपारी देऊन केला खुनीहल्ला

फिर्यादी हा कोथरुड परिसरातील एका शाळेत शिक्षण घेत आहे. रात्री तो शिकवणीवरून घरी निघाला होता दुचाकीतील पेट्रोल संपल्याने तो भेलकेनगर चौकात थांबला होता. मदतीसाठी त्याने मित्राला बोलावून घेतले. दरम्यान, आरोपी विजय तेथे आला. ‘तू इथे थांबायचे नाही, मी कोण आहे माहीत आहे का?’ अशी धमकी देऊन शिवीगाळ केली. मुलाने त्याच्याकडे दुर्लक्ष केले.

त्यानंतर आरोपीने दोन साथीदारांना बोलावून घेतले. आरोपींनी शाळकरी मुलांच्या डोक्यात गज मारला. त्याचा मित्र घटनास्थळी आला. त्याने भांडणे सोडविण्याचा प्रयत्न केला. त्याला आरोपींनी मारहाण केली. पोलीस उपनिरीक्षक तानाजी पांढरे तपास करत आहेत.