पुणे : वैमनस्यातून दोन गटात हाणामारी झाल्याची घटना सिंहगड रस्त्यावरील धायरी भागात घडली. याप्रकरणी परस्पर विरोधी फिर्यादीवरुन दाेन गटांविरुद्ध सिंहगड रस्ता (नांदेड सिटी) पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत स्वप्नील संतोष खिरीड (वय २०, रा. लायगुडे वस्ती, अंबाईदरा, धायरी) याने सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्याने दिलेल्या फिर्यादीनुसार, अविनाश शिळीमकर, कुणाल जाधव, आदित्य म्हस्के, अथर्व दोडके, अथर्व शिंदे यांच्यासह साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिळीमकर, म्हस्के, दोडके यांना अटक करण्यात आली आहे. दोन दिवसांपूर्वी आरोपी खिरीड याच्या घरी आले. तुझा भाऊ कोठे आहे, अशी विचारणा केली. त्यानंतर आरोपींनी खिरीड याच्यावर कोयते उगारले. त्याला जिवे मारण्याचा प्रयत्न केला. एका महिलेला शिवीगाळ करुन तिच्या पतीला जिवे मारण्याची धमकी दिली, असे खिरीडने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.

Mumbai , constructions, MHADA , projects, Notices ,
मुंबई : उल्लंघन करणाऱ्या ४७७ बांधकामांना नोटीस, ३३ प्रकल्पांना काम थांबविण्याचे म्हाडाचे आदेश
Pushpak train accident of karnataka express play horn may save life of many passengers
Jalgaon Train Accident : कर्नाटक एक्स्प्रेसच्या चालकाने भोंगा वाजवला…
drug, Nagpur , drug addiction, narcotics ,
नागपूर शहर बनले नशाखोरीचे केंद्र, वर्षभरात ३ कोटींचे अंमली पदार्थ जप्त
indian tectonic plate
तिबेट खालील भारतीय टेक्टोनिक प्लेट दुभंगणार? भूवैज्ञानिकांनी व्यक्त केली चिंता; याचा काय परिणाम होणार?
Traffic police and Municipal Corporation are trying to speed up traffic in Pune news
वाहतूक मंदीत मिनिटभराने सुधारणा! उपाययोजनांमुळे गती वाढल्याचा पुणे पोलिसांचा दावा
Nagpur municipal corporation
नागपूर : मकर संक्रांतीच्या पार्श्वभूमीवर उपद्रव शोध पथक सक्रिय
Gang involved in gold chain and vehicle theft arrested
सोनसाखळी, वाहनचोरी करणारी टोळी उघडकीस; सराईत अटकेत, दोन अल्पवयीन ताब्यात
Vandalism ,ransom , shopkeeper, Shivne area,
पुणे : दुकानदाराकडे खंडणीची मागणी करुन तोडफोड, शिवणे भागात सराइताची दहशत

हेही वाचा…कोथिंबिरेच्या दरात घट; मेथी तेजीत, फळभाज्यांचे दर स्थिर

आरोपी शिळीमकर याने परस्पर विरोधी फिर्याद दिली आहे. त्याने दिलेल्या फिर्यादीनुसार, अमित कदम, ओंकार भाेसले यांच्यासह पाचजणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिळीमकर आणि त्याचे मित्र धायरीतील पोकळे वस्ती परिसरात थांबले होते. आरोपी कदम, भोसले आणि साथीदार तेथे आले. त्यांनी शिळीमकर याच्या अंगावर मोटार घालून जिवे मारण्याचा प्रयत्न केला, अशी फिर्याद शिळीमकर याने दिली आहे. सहायक पोलीस निरीक्षक जाधव आणि उपनिरीक्षक बुनगे तपास करत आहेत

Story img Loader