आगामी वर्षात सनदी लेखापाल (सीए) अभ्यासक्रम बदलणार आहे. त्यात आता सहा पेपर द्यावे लागणार असून, तंत्रज्ञानही अंतर्भूत करण्यात येणार आहे. त्याशिवाय भारतीय राज्यघटनेचाही अभ्यासक्रमात समावेश करण्यात आला आहे.दि इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटेंट्स ऑफ इंडियाच्या (आयसीएआय) पश्चिम भारत विभागीय परिषदेचे (डब्ल्यूआयआरसी) अध्यक्ष मुर्तझा काचवाला यांनी माहिती दिली. डब्ल्यूआयआरसीचे उपाध्यक्ष यशवंत कासार, खजिनदार पीयुष चांडक, विभागीय समिती सदस्या ऋता चितळे, पुणे शाखेचे अध्यक्ष काशिनाथ पठारे, सदस्य प्रणव आपटे, अमृता कुलकर्णी आदी या वेळी उपस्थित होते. त्यापूर्वी डब्ल्यूआयआरसीच्या शिष्टमंडळाने वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) आयुक्तालयात प्रधान मुख्य आयुक्त एस. एम. टाटा, प्रवीण कुमार यांची भेट घेऊन चर्चा केली.

हेही वाचा >>>पुणे: खराब पाव परत केल्याने बेकरीचालकाकडून मुलाला मारहाण; भवानी पेठेतील घटना

indian army 140th technical graduate course Apply Online for 30 Officers Posts, Check Notification and Eligibility
भारतीय सैन्यात नोकरीची संधी! तांत्रिक पदवी अभ्यासक्रमासाठी ‘इतक्या’ पदांची भरती; असा करा अर्ज
Admission Delayed, 500 Students of college of physican and surgeon, Maharashtra, 500 Students Still Awaiting Admission, physician students, surgeon students, admission awating physican students,
मान्यतेनंतरही सीपीएस अभ्यासक्रमाचे प्रवेश सुरू करण्यास मुहूर्त सापडेना, ५०० जागांवरील प्रवेशासाठी विद्यार्थी प्रतीक्षेत
Career After 12th Medical courses after twelfth in Marathi
Career After 12th : बारावीनंतर तुम्हाला वैद्यकीय क्षेत्रात करियर करायचेय? मग ‘या’ अभ्यासक्रमांमध्ये घेऊ शकता प्रवेश
Changes in Composite Assessment Test Exam Schedule
संकलित मूल्यमापन चाचणी परीक्षा वेळापत्रकात बदल

आगामी वर्षात सनदी लेखापाल (सीए) अभ्यासक्रम बदलणार आहे. त्यात आता सहा पेपर द्यावे लागणार असून, तंत्रज्ञानही अंतर्भूत करण्यात येणार आहे. काचवाला म्हणाले, की सनदी लेखापाल हा अर्थव्यवस्थेच्या प्रगतीत योगदान देणारा महत्वाचा घटक आहे. आर्थिक व्यवस्थापन अधिक प्रभावी होण्यासाठी सनदी लेखापाल, तसेच सनदी लेखापाल अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांसाठी सातत्याने प्रशिक्षण सत्रे आयोजित केली जातात. तंत्रज्ञानाभिमुख, जागतिक दर्जाचे सक्षम सनदी लेखापाल घडवण्यावर आयसीएआय भर देत आहे. त्याचाच भाग म्हणून आता अभ्यासक्रमात बदल करण्यात येणार आहे.