पदवीधर विद्यार्थ्यांची रोजगारक्षमता वाढीसाठी अभ्यासक्रमांची निर्मिती करण्याचे यूजीसीचे निर्देश |increase employability of graduate students ugc develop courses pune | Loksatta

पुणे : पदवीधर विद्यार्थ्यांची रोजगारक्षमता वाढीसाठी अभ्यासक्रमांची निर्मिती करण्याचे यूजीसीचे निर्देश

यूजीसीकडून कौशल्य विकासाचे अभ्यासक्रम राबवण्यासंदर्भातील मार्गदर्शक सूचना प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत.

पुणे : पदवीधर विद्यार्थ्यांची रोजगारक्षमता वाढीसाठी अभ्यासक्रमांची निर्मिती करण्याचे यूजीसीचे निर्देश
संग्रहित छायाचित्र

पुणे : पदवीधर विद्यार्थ्यांची रोजगारक्षमता वाढण्यासाठी देशभरातील विद्यापीठे आणि संलग्न महाविद्यालयांनी आघाडीच्या माहिती तंत्रज्ञान कंपन्यांशी चर्चा करून उद्योग केंद्रीत अभ्यासक्रमांची निर्मिती करावी. या अभ्यासक्रमांसाठी श्रेयांक देता येऊ शकतात, असे निर्देश विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) दिले आहेत.यूजीसीचे सचिव प्रा. रजनीश जैन यांनी या संदर्भातील परिपत्रक प्रसिद्ध केले आहे. ‘नॅशनल स्कील क्वालिफिकेशन फ्रेमवर्क’अंतर्गत (एनएसक्यूएफ) यूजीसीकडून कौशल्य विकासाचे अभ्यासक्रम राबवण्यासंदर्भातील मार्गदर्शक सूचना प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत.

एनएसक्यूएफमध्ये ज्ञान, कौशल्य आणि कल यावर भर देण्यात आला आहे. त्यामुळे उद्योगांकडून श्रेयांकांसहित अभ्यासक्रमाची निर्मिती झाल्यास संबंधित अभ्यासक्रम एनएसक्यूएफशी समकक्ष असणे आवश्यक असल्याचे नमूद करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर उच्च शिक्षण संस्थांनी उद्योग क्षेत्राशी, माहिती तंत्रज्ञान कंपन्यांशी संवाद साधून उद्योगकेंद्रित अभ्यासक्रमांची निर्मिती, प्रचारासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. या अभ्यासक्रमांसाठी श्रेयांक देता येऊ शकतात. या अभ्यासक्रमांतून पदवीधर विद्यार्थ्यांची रोजगारक्षमता वाढण्यात मदत होईल, असेही प्रा. जैन यांनी स्पष्ट केले.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
पुणे : दारू पिण्यास मनाई केल्याने जीवे मारण्याची धमकी ; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

संबंधित बातम्या

“विक्रम गोखले तीन महिन्यांपूर्वी पोलीस ठाण्यात आले होते, तेव्हा…”, वरीष्ठ पोलीस निरीक्षकांनी सांगितली ‘ती’ आठवण!
VIDEO: अभिनेते विक्रम गोखलेंची प्रकृती खालावली, रुग्णालयाची माहिती
विठू नामाच्या गजरात तुकोबारायांच्या पालखीचे पंढरपूरकडे प्रस्थान!
घरभाडं मागण्यासाठी गेलेल्या घरमालकाच्या मुलाला चौथ्या मजल्यावरून ढकललं; पुण्यातील धक्कादायक घटना
ग्रामपंचायत पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर

व्हिडिओ

ताज्या बातम्या
Gujarat Election 2022: अहमदाबादमधून अमित शाह नावाच्या व्यक्तीला भाजपाकडून उमेदवारी
वादग्रस्त ट्वीटप्रकरणी रिचा चड्ढाविरुद्ध कारवाईची तयारी; मध्य प्रदेशच्या गृहमंत्र्यांकडून माहिती
‘म्हाडा’ची ४६७८ घरांसाठी पुढील आठवडय़ात सोडत 
कर्तव्यपालनास प्राधान्य द्या!; संविधानदिनी पंतप्रधान मोदींचे आवाहन
Shraddha Walker murder case: पोलिसांना डीएनए चाचणी अहवालाची प्रतीक्षा