सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील भोजनगृहातील भोजनाच्या दरांमध्ये वाढ केली आहे. आता भोजनगृहाचे सदस्यत्त्व असेल्या विद्यार्थ्यांना शाकाहारी थाळीसाठी ३८ रूपये मोजावे लागणार आत्त. सदस्यत्त्व न घेणाऱ्या विद्यार्थ्यांना आणि इतरांसाठी भोजनासाठी ४७ रुपये द्यावे लागणार आहेत. नव्या निर्णयाची अंमलबाजवणी १ जानेवारीपासून करण्यात येणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >>>‘राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची उचलबांगडी करा’; लावणी सम्राज्ञी सुरेखा पुणेकर यांची मागणी

विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेने घेतलेल्या निर्णयानुसार भोजनाच्या दरवाढीची माहिती गृहव्यवस्थापन विभागाने परिपत्रकाद्वारे दिली. नव्या निर्णयानुसार विद्यार्थ्यांना थाळीसाठी ३८ रुपये द्यावे लागतील. मिनी मर्यादित थाळीसाठी २८ रुपये आकारले जातील. तर या थाळीसाठी सदस्य नसलेले विद्यार्थी आणि इतरांसाठी ३५ रुपये दर असेल. विद्यापीठातील भोजनाचे बाजारपेठेतील हॉटेलच्या दरांच्या तुलनेत कमी आहेत. विद्यापीठाकडून भोजनगृहाच्या ठेकेदाराला अनुदान देण्यात येते. दरवर्षी भोजनाच्या दरांमध्ये एक रुपयाने वाढ करण्यात येणार असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.

हेही वाचा >>>मनसे नेते वसंत मोरे राष्ट्रवादीत जाणार? अमित ठाकरे भेटीनंतर स्पष्ट केली भूमिका, म्हणाले “इतर पक्षात जर…”

विद्यार्थ्यांना ठरलेल्या कराराप्रमाणे पदार्थ मिळत नसल्याने, या निर्णयाला विद्यार्थ्यांनाकडून विरोध होण्याची शक्यता आहे. विद्यापीठ प्रशासनाने ठरवलेल्या नियमावलीची अंमलबजावणी होत नाही. ठरवून दिलेले पदार्थ विद्यार्थ्यांना मिळत नाहीत. या बाबत वारंवार कुलसचिवांकडे तक्रारी करूनही बदल झालेला नाही. उलट भोजनाचे दर वाढवणे हे चुकीचे आहे. त्यामुळे ही दरवाढ तत्काळ मागे घेऊन नियमावलीनुसार भोजन देण्याची मागणी युक्रांद या विद्यार्थी संघटनेने केली.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Increase in price of food in university canteen pune print news ccp 14 amy
First published on: 09-12-2022 at 16:16 IST