scorecardresearch

Premium

पुणे: हिरवी मिरची, घेवडा, मटारच्या दरात वाढ

घाऊक बाजारात आवक कमी झाल्याने हिरवी मिरची, घेवडा, मटारच्या दरात १० ते २० टक्क्यांनी वाढ झाली.

vegetable
गुलटेकडी येथील श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्डात राज्य, तसेच परराज्यांतून ९० ट्रक फळभाज्यांची आवक झाली.(फोटो सौजन्य- प्रातिनिधिक छायाचित्र)

लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे : घाऊक बाजारात आवक कमी झाल्याने हिरवी मिरची, घेवडा, मटारच्या दरात १० ते २० टक्क्यांनी वाढ झाली. बहुतांश फळभाज्यांचे दर स्थिर असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली.

yavatmal theft marathi news, jewellery of rupees 30 lakhs stolen yavatmal marathi news, raymond company s housing colony yavatmal
‘रेमंड’मधील अधिकाऱ्याच्या बंगल्यातून चक्क ३० लाखांचे दागीने लंपास; सुरक्षा भेदून चोरी
pune vegetable price marathi news, vegetable price pune marathi news
पुणे : उन्हाचा चटका वाढला, भाज्या किती झाल्या महाग ?
Veg thali cost increases in Janury and non veg thali rates fall
सर्वसामान्यांच्या खिशाला बसणार झळ! शाकाहारी थाळी झाली महाग अन् मांसाहारी थाळीचे दर…
Gold Silver Price on 6 February
Gold-Silver Price on 6 February 2024: सोन्याच्या भावात वाढ झाल्यानंतर आता घसरण, लगेच पाहा मुंबई-पुण्यातील १० ग्रॅमचा दर

आणखी वाचा-पिंपरी: पत्नीबद्दल अश्लील शब्द वापरले; जखमी मित्राला नाशिक फाटा पुलावरून ढकलून केली हत्या!

गुलटेकडी येथील श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्डात रविवारी (१७ सप्टेंबर) राज्य, तसेच परराज्यांतून ९० ट्रक फळभाज्यांची आवक झाली. गुजरात, कर्नाटकमधून ७ टेम्पो हिरवी मिरची, गुजरात, कर्नाटकमधून मिळून ४ टेम्पो कोबी, आंध्र प्रदेश आणि तामिळनाडूतून २ टेम्पो शेवगा, कर्नाटकातून ४ टेम्पो घेवडा, इंदूरमधून ८ टेम्पो गाजर, बंगळुरूतून १ टेम्पो आले, मध्य प्रदेश आणि गुजरातमधून मिळून ८ टेम्पो लसूण, आग्रा, इंदूर, तसेच पुणे विभागातून मिळून ४५ ट्रक बटाट्याची आवक झाली, अशी माहिती घाऊक बाजारातील प्रमुख अडते विलास भुजबळ यांनी दिली.

आणखी वाचा-पिंपरीत ‘पंतप्रधान आवास’च्या दोन हजार सदनिका… इच्छुक अर्जांच्या छाननीसाठी अडीच कोटींची उधळण?

पुणे विभागातून सातारी आले ७०० गोणी, टोमॅटो १० हजार पेटी, फ्लॉवर १० टेम्पो, कोबी ५ टेम्पो, पुरंदर, वाई, सातारा भागातून मटार ६ टेम्पो, पावटा ५ टेम्पो, भुईमूग शेंग १२५ गोणी, ढोबळी मिरची १० टेम्पो, तांबडा भोपळा १० टेम्पो, कांदा ८० ट्रक अशी आवक झाली.

Latest Comment
View All Comments
Post Comment

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Increase in prices of green chillies ghewda and peas pune print news rbk 25 mrj

First published on: 17-09-2023 at 16:33 IST

आजचा ई-पेपर : पुणे

वाचा
epaper image

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×