पुणे : परदेशात वाहन चालविण्यासाठी आवश्यक असलेला आंतराष्ट्रीय वाहन चालक परवाना काढणाऱ्यांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत असल्याचे समोर आले आहे. गेल्या तीन वर्षांत १३ हजारांहून अधिक पुणेकरांना असे परवाने देण्यात आले आहेत. पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालयात (आरटीओ)अधिकृत नोंद करण्यात आली असून आंतरराष्ट्रीय वाहन परवानाधारकांची संख्या वाढल्याचे स्पष्ट होत आहे.

पुणे ‘आरटीओ’ कार्यालयाने दिलेल्या आकडेवारीनुसार २०२२ – २३ या वर्षभरात चार हजार २९४ नागरिकांनी, तर २०२३-२४ साली पाच हजार २१० नागरिकांनी आंतरराष्ट्रीय वाहन परवाना घेतला आहे, तर गेल्या वर्षभरात (नोव्हेंबर २०२४ पर्यंत) तीन हजार ६९३ जणांनी परवाना काढला. त्यामुळे आंतरराष्ट्रीय वाहन परवाना काढणाऱ्यांच्या संख्येत वाढ झाली असल्याचे दिसून आले आहे.

Nashik, minor drivers, parents fined,
नाशिक : आठ अल्पवयीन वाहन चालकांसह पालकांना दंड, प्रादेशिक परिवहनची कारवाई
Manoj Jarange, Manoj Jarange movement,
विश्लेषण : मनोज जरांगे यांच्या आंदोलनाचा प्रभाव ओसरला?…
Development Plan, Nashik Metropolitan Authority Area,
नाशिक महानगर प्राधिकरण क्षेत्रासाठी विकास आराखडा; चांदशी, जलालपूरमधील सांडपाण्याचे नियोजन
fund approved during administrator rule in PMC
महापालिकेतील माजी सभागृह नेत्यासाठी कोट्यवधींचा ‘खास’ निधी !
stray dog attacks 6 people in ulhasnagar
भटक्या श्वानाचा ६ जणांवर हल्ला; उल्हासनगरातील घटना, भटक्या श्वानांचा प्रश्न गंभीर
फेरीवाल्यांना अधिवास प्रमाणपत्र अनिवार्य का नाही? उच्च न्यायालयाची राज्य सरकार, महानगरपालिकेला विचारणा
pm narendra modi on us visit
स्थलांतरितांना बेड्या घालणे टाळता आले असते! भारताकडून अमेरिकेकडे चिंता
Sanjay raut on all part mps meeting
खासदारांच्या बैठकीला मुहूर्तच मिळेना; नवीन खासदारांची एकही बैठक नाही

हेही वाचा >>>पिंपरी : महापालिकेतील अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या अंतर्गत बदल्या प्रलंबित; बदली धाेरणाच्या अंमलबजावणीस टाळाटाळ?

नोकरी, शिक्षणासाठी परदेशात राहणाऱ्यांची संख्या वाढत आहे. अशा भारतीय नागरिकांना वाहन चालविण्यासाठी आंतरराष्ट्रीय वाहन परवान्याची गरज असते. यासाठी देशातील ज्या नियोजित ठिकाणी राहणार आहे, तेथील ‘आरटीओ’ प्रशासनाकडून चालकाला आंतरराष्ट्रीय वाहन परवाना काढावा लागतो, परंतु, संबंधित ठिकाणच्या देशातील प्रक्रिया कार्यालयात जाऊन करण्यात येणारी प्रक्रिया किचकट असल्याने अनेक नागरिक परदेशात जाण्यापूर्वीच स्थानिक राज्यातील स्थानिक ‘आरटीओ’तून वाहन चालक परवाना काढण्यास पसंती देत आहेत.

हेही वाचा >>>पिंपरी- चिंचवमधील वाल्मीक कराडच्या फ्लॅटचा लिलाव तूर्तास टळला; वाल्मिकचे दोन फ्लॅट असल्याचं झालं होतं उघड

२०१८ पूर्वी ही प्रक्रिया प्रत्यक्षात जाऊन करावी लागत असे. कागदपत्रांची जमवाजमव, त्रुटी यामुळे विलंब लागत असे. त्या पार्श्वभूमीवर अशा नागरिकांना परवाना काढणे सोपे जावे, यासाठी २०१८ पासून ही प्रक्रिया ऑनलाइन करण्यात आली. यानुसार संबंधित अर्जदाराला परिवहन मंत्रालयाच्या ‘सारथी’ या संकेतस्थळावरून ऑनलाईन अर्ज करता येत आहे. याठिकाणी आवश्यक कागदपत्रे संगणकीकरण करून संकलीत करावी लागत असल्याने घरबसल्या ही प्रक्रीया सुलभ करण्यात आली आहे. या परवान्यासाठी संबंधित अर्जदाराकडे वाहन परवाना असल्यास पुन्हा वाहन चालवणे तसेच परीक्षा देण्याची गरज नाही. मात्र, सध्याचा वाहन चालक परवाना, पारपत्र, व्हीसा याची पडताळणी केली जाते. ऑनलाइन प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर अर्जदाराला मूळ कागदपत्रे घेऊन प्रत्यक्ष पडताळणीसाठी ‘आरटीओ’ कार्यालयात बोलावले जाते. त्यानंतर कागदपत्रांची तपासणी करून एका दिवसात आंतरराष्ट्रीय वाहन परवाना दिला जात आहे.

केंद्रीय परिहवन विभागाकडून ऑनलाईन आणि सुलभ सुविधा उपलब्ध करून दिली आहे. त्यानुसार परदेशात जाण्यापूर्वी संबंधित व्यक्तीच्या पारपत्र आणि व्हीसाचा कालावधी आणि कागदपत्रांची पडताळणी करून वाहन चालक परवाना देण्यात येत आहे. गेल्या दोन वर्षांपासून आंतरराष्ट्रीय वाहन चालविण्यासाठीचा परवाना काढणाऱ्यांच्या संख्येत वाढ झाली आहे. – स्वप्नील भोसले, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी, पुणे</strong>

‘आरटीओ’तून देण्यात आलेले आंतरराष्ट्रीय परवाने

वर्ष – संख्या

२०२२-२३    ४,२९४

२०२३-२४   ५,२१०

२०२४ (नोव्हेंबर पर्यंत)    ३,६९३

Story img Loader