पुणे मार्केट यार्डातील घाऊक बाजारात मागणी वाढल्याने वांगी, भेंडी, ढोबळी मिरचीच्या दरात वाढ झाली असून अन्य फळभाज्यांचे दर स्थिर असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली. लिंबू, अननस, सीताफळ, सफरचंदाच्या दरातही वाढ झाली आहे.

हेही वाचा- पुणे : बेकायदा नायलाॅन मांजाची विक्री करणाऱ्यांवर ‘संक्रांत’; गुन्हे शाखेकडून पतंग विक्रेत्याच्या विरोधात गुन्हा

After the Kanker encounter in Chhattisgarh the police claim that the Naxalites supply system has been hit
नक्षलवाद्यांच्या पुरवठा यंत्रणेला धक्का; छत्तीसगडमधील कांकेर चकमकीनंतर पोलिसांचा दावा 
India Wholesale Inflation Reaches 3 Month High
घाऊक महागाई दर मार्चमध्ये किंचित वाढून तिमाही उच्चांकावर
Police Raid, Spa Centers, Hinjewadi, Wakad, sex racket, Rescue Eight Women, crime in Hinjewadi, crime in Wakad, crime in chinchwad, crime in pimpri, sex racket, prostitute, police raid on spa,
पिंपरी : आयटी हिंजवडी आणि उच्चभ्रू वाकडमध्ये स्पा सेंटरवर पोलिसांचा छापा; आठ महिलांची सुटका
Loksatta anvyarth wheat rates Pradhan Mantri Garib Kalyan Food Yojana to Central Government
अन्वयार्थ: गव्हाचा सरकारी तिढा!

गुलटेकडी येथील श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्डात रविवारी (८ जानेवारी) राज्य; तसेच परराज्यांतून १०० ट्रक फळभाज्यांची आवक झाली. गेल्या आठवड्याच्या तुलनेत फळभाज्यांची आवक वाढली. आंध्र प्रदेश, कर्नाटक, गुजरातमधून मिळून १० ते १२ ट्रक हिरवी मिरची, आंध्र प्रदेश, कर्नाटक आणि गुजरातमधून मिळून ३ ते ४ टेम्पो कोबी, राजस्थानातून ९ ते १० टेम्पो गाजर, पंजाब आणि मध्य प्रदेशातून मिळून २८ ते ३० टेम्पो मटार, गुजरातमधून २ टेम्पो भुईमूग शेंग, कर्नाटकातून ३ ते ४ टेम्पो घेवडा, बंगळुरुतून ३ टेम्पो आले, मध्य प्रदेश आणि गुजरातमधून मिळून ८ ते १० ट्रक लसूण, आग्रा, इंदूर तसेच पुणे विभागातून मिळून ५० ट्रक बटाटा अशी आवक परराज्यांतून झाली, अशी माहिती घाऊक बाजारातील प्रमुख अडते विलास भुजबळ यांनी दिली.

हेही वाचा- शरद पवार आणि देवेंद्र फडणवीसांचा एकाच गाडीतून प्रवास, राजकीय चर्चांना उधाण

पुणे विभागातून सातारी आले ११०० ते १२०० गोणी, टोमॅटो ११ ते १२ हजार पेटी, भेंडी ६ ते ७ टेम्पो, हिरवी मिरची ३ ते ४ टेम्पो, फ्लाॅवर १० ते १२ टेम्पो, कोबी ५ ते ६ टेम्पो, ढोबळी मिरची ७ ते ८ टेम्पो, तांबडा भोपळा १० ते १२ टेम्पो, घेवडा ४ ते ५ टेम्पो, काकडी ७ ते ८ टेम्पो, कांदा १२५ ट्रक अशी आवक झाली.

मेथी, चाकवत, हरभरा गड्डीच्या दरात वाढ

मार्केट यार्डातील तरकारी विभागात मेथी, चाकवत, पुदिना, हरभरा गड्डी या पालेभाज्यांच्या दरात वाढ झाली. कोथिंबीर, शेपू, कांदापात, करडई, अंबाडी, मुळा, चुका, चवळईचे दर स्थिर असल्याची माहिती तरकारी विभागातील व्यापाऱ्यांनी दिली. घाऊक बाजारात कोथिंबिरीच्या एक लाख २५ हजार जुडींची आवक झाली. मेथीच्या ७० हजार जुडींची आवक झाली. घाऊक बाजारात मेथीच्या जुडीमागे ३ रुपये, हरभरा गड्डीच्या जुडीमागे २ रुपये, चाकवत आणि पुदिन्याच्या जुडीमागे १ रुपयांनी वाढ झाली. पालकाच्या जुडीमागे २ रुपये, राजगिऱ्याच्या जुडीमागे १ रुपयांनी वाढ झाली.

हेही वाचा- “…म्हणून मी हल्ली फार बोलत नाही”, महाराष्ट्रातील राजकीय परिस्थितीवर राज ठाकरेंचं परखड मत

फळबाजारात ५ टन स्ट्राॅबेरीची आवक

मार्केट यार्डातील फळबाजारात स्ट्राॅबेरीची आवक वाढली असून रविवारी वाई, सातारा, महाबळेश्वर तसेच नाशिक जिल्ह्यातून मिळून ५ टन स्ट्राॅबेरीची आवक झाली. संत्री १० टन, मोसंबी २५ टन, जुन्या बहारातील माेसंबी १५ टन, डाळिंब २० टन, पपई १० टेम्पो, लिंबे ३ हजार गोणी, पेरु १० टन, कलिंगड, खरबूज प्रत्येकी १५ टेम्पो, बोरे ७०० पोती, सीताफळ १० टन, सांगली,बारामती, फलटण, इंदापूर भागातून २ टन द्राक्षांची आवक झाली.

हेही वाचा- Video: गोष्ट पुण्याची – इंग्रजी शाळांच्या गर्दीत १२५ वर्ष नावीन्य टिकवून ठेवणारी ‘नवीन मराठी शाळा‘

मासळीच्या दरात वाढ

थंडीमुळे मासेमारी कमी प्रमाणावर होत आहे. मासळीची आवक कमी झाल्याने दरात १० ते २० टक्क्यांनी वाढ झाली. मासळीला मागणी चांगली आहे. खोल समुद्र आणि खाडीतील मासळीच्या दरात वाढ झाल्याची माहिती मासळी बाजारातील विक्रेते ठाकूर परदेशी यांनी दिली. आंध्र प्रदेश आणि नदीतील मासळीचे दर स्थिर आहेत. रविवारी गणेश पेठेतील मासळी बाजारात खोल समुद्रातील मासळी १० ते १५ टन, खाडीतील मासळी २०० ते २५० किलो, नदीतील मासळी २०० ते ४०० किलो, आंध्र प्रदेशातून रहू, कतला, सीलन या मासळीची एकूण मिळून १५ ते १५ टन आवक झाली. चिकन, मटणाचे दर स्थिर असल्याची माहिती चिकन विक्रेते रुपेश परदेशी आणि मटण विक्रेते प्रभाकर कांबळे यांनी दिली.