पुणे : मागणी वाढल्याने टोमॅटो, कोबी, ढोबळी मिरचीच्या दरात वाढ झाली. अन्य फळभाज्यांचे दर स्थिर असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली.श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्डातील घाऊक बाजारात रविवारी (६ ऑक्टोबर) राज्य, तसेच परराज्यातून मिळून ९० ते १०० ट्रक फळभाज्यांची आवक झाली. कर्नाटक, गुजरात, आंध्र प्रदेशातून मिळून ७ ते ८ टेम्पो हिरवी मिरची, कर्नाटक, गुजरातमधून मिळून प्रत्येकी ४ ते ५ टेम्पो कोबी, कर्नाटकातून ३ ते ४ टेम्पो पावटा, कर्नाटक आणि गुजरातमधून ३ ते ४ टेम्पो घेवडा, आंध्र प्रदेश, तमिळनाडूतून मिळून २ ते ३ टेम्पो शेवगा, मध्य प्रदेशातील इंदूर भागातून ७ ते ८ टेम्पो गाजर, कर्नाटक, गुजरातमधून ५ ते ६ टेम्पो भुईमूग शेंग, मध्य प्रदेशातून ७ ते ८ टेम्पो लसूण अशी आवक परराज्यातून झाली, अशी माहिती मार्केट यार्डातील ज्येष्ठ अडते विलास भुजबळ यांनी दिली.

हेही वाचा >>>हनुमान टेकडीवर कोयत्याच्या धाकाने महाविद्यालयीन तरुणाची लूट; चोरट्यांच्या मारहाणीत तरुण जखमी

harbhara farming
लोकशिवार: किफायतशीर हरभरा!
MNS Chief Raj Thackeray
महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण होईल? राज ठाकरेंनी थेट…
farm distress maharashtra election
विधानसभा निवडणुकीत शेतीचे मुद्दे किती प्रभावी? राज्यातील शेतीची सद्यस्थिती काय?
Due to increase in demand prices of guar cabbage brinjal groundnuts peas increased
गवार, कोबी, वांगी, मटार महाग
tomato ketchup adulteration
टोमॅटो सॉसमधील भेसळ कशी ओळखाल? जाणून घ्या तज्ज्ञांचा सल्ला
MSP on agricultural produce
विश्लेषण : शेतमालाचे जाहीर हमीभाव शेतकऱ्याला प्रत्यक्षात मिळतात का?
onion belt in maharashtra Mahayuti performance Asssembly Election
Onion Belt in Maharashtra: कांदा उत्पादक शेतकरी यावेळी भाजपाला पाठिंबा देणार? महायुतीची ‘ही’ रणनीती यशस्वी होईल?
Kolhapur rain paddy crops
Kolhapur Rain News: कोल्हापूर जिल्ह्यात परतीच्या पावसामुळे पिकांना फटका

पुणे विभागातून सातारी आले ४०० ते ५०० गोणी, भेंडी ७ ते ८ टेम्पो, गवार ५ ते ६ टेम्पो, टोमॅटो साडेपाच ते सहा हजार पेटी, हिरवी मिरची २ ते ३ टेम्पो, ढोबळी मिरची ७ ते ८ टेम्पो, पुरंदर, पारनेर, वाई, सातारा परिसरातून मटार ५० ते ६० गोणी, काकडी ८ ते १० टेम्पो, कोबी ५ ते ६ टेम्पो, फ्लाॅवर ८ ते १० टेम्पो, तांबडा भोपळा १० ते १२ टेम्पो, कांदा ७० ते ७५ ट्रक, तसेच इंदूर, आग्रा, स्थानिक भागातून ५५ ते ६० टेम्पो बटाट्याची आवक झाली.

कोथिंबिर, करडई, मुळे, राजगिऱ्याच्या दरात वाढ

नवरात्रोत्सवातील उपवासासाठी राजगिऱ्याच्या मागणीत वाढ झाली आहे. कोथिंबिर, राजगिरा, करडई, मुळे या पालेभाज्यांच्या दरात गेल्या आठवड्याच्या तुलनेत वाढ झाली. मेथी, शेपू, कांदापात, पुदिना, अंबाडी, चुका, पालक या पालेभाज्यांचे दर स्थिर असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली. मार्केट यार्डातील तरकारी विभागात कोथिंबीर सव्वा लाख जुडी, तसेच मेथीच्या ७० हजार जुडींची आवक झाली. गेल्या आठवड्यात किरकोळ बाजारात कोथिंबिरीच्या एका जुडीचे दर ५० ते ७० रुपये होते. मेथीच्या एका जुडीचे दर ४० ते ५० रुपये होते. पालेभाज्यांचे शेकड्याचे दर पुढीलप्रमाणे – कोथिंबीर- १००० ते १५००, मेथी – ८०० ते १०००, शेपू – ५०० ते ८००, कांदापात- ८०० ते १२००, चाकवत – ४०० ते ७००, करडई- ४०० ते ७००, पुदिना – ५०० ते ८००, अंबाडी – ५०० ते ७००, मुळे – ८०० ते १५००, राजगिरा- ४०० ते ८००, चुका – ५०० ते ८००, चवळई- ३००-६००, पालक- ८००-१५००.

हेही वाचा >>>कौटुंबिक वादातून महिलेचा खून; सहा वर्षांच्या मुलाला घेऊन पती पसार

नवरात्रोत्सवामुळे फुलांना मागणी

नवरात्रोत्सवामुळे फुलांना मागणी वाढली असून, दर तेजीत असल्याची माहिती फूल बाजारातील व्यापारी सागर भोसले यांनी दिली. घाऊक बाजारात प्रतिकिलो फुलांचे दर पुढीलप्रमाणे- झेंडू – १०-५०, गुलछडी (सुट्टी)- १५०-२५०, अष्टर जुडी- २०-३०, सुट्टा – १००-१५०, शेवंती – ४०-२००, गुलाब गड्डी – २०-३०, गुलछडी काडी – १५-५०, डच गुलाब (२० नग) – ५०-१००, जर्बेरा – २०-४०, कार्नेशियन – १००-१५०, शेवंती काडी – १००-२००, लिलियम (१० काड्या) – ८००-१०००, ऑर्चिड ३००- ५००, जिप्सोफिला- ५०-६०, जुई – ७००-१०००