“भारताच्या स्वातंत्र्यासाठी लाखो तरुणांनी वंदे मातरम म्हणत फासावर लटकून घेतलं ते वंदे मातरम गीत तुमचं आमचं राष्ट्रगीत नाही. १८९८ साली पंचम जॉर्ज राजाच्या स्वागतासाठी रवींद्रनाथ टागोर यांना ‘जन गण मन’ हे गीत सुचलं ” असं विधान संभाजी भिडे यांनी केलं आहे. ते रविवारी पिंपरी- चिंचवडमध्ये बोलत होते. १५ ऑगस्ट हे हांडगे स्वातंत्र्य असलं तरी पत्करले पाहिजे. सबंध देशावर हिंदवी स्वराज्य येत नाही तोपर्यंत १५ ऑगस्ट हा स्वातंत्र्य दिन दुःखाचाही आहे, त्या दिवशी कडकडीत उपवास करायचा असेही ते म्हणाले.

हेही वाचा… आमदार रवींद्र धंगेकर थेट आरटीओत! अधिकाऱ्यांच्या कामाची झाडाझडती

हेही वाचा… पुणे: सर्वाधिक उत्पन्न पुण्यातून मग नागपूर कशाला…? आमदार रवींद्र धंगेकरांचा सवाल

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या वर्षापासून १५ ऑगस्ट या दिवशी हिंदवी स्वराज्य स्वातंत्र्य दिन पदयात्रा काढून स्वातंत्र्यदिन साजरा करूयात. या दिवशी कडकडीत उपवास करायचा. भगव्या झेंड्याला नैवेद्य दाखवून संध्याकाळी कोरभर भाकरी खायची. जो पर्यंत १५ ऑगस्ट साजरा करतो आहोत तोपर्यंत करायचंच. ज्या दिवशी संबंध देशावर हिंदवी स्वराज्य येत नाही तोपर्यंत आमचा स्वातंत्र्य दिन दुःखाचाही आहे. हे असं महाराष्ट्र करेल, अन्य राज्यात असा विचार रुजायला वेळ लागेल. दिल्लीवरती भगव्या झेंड्याचंच राज्य पाहिजे असंही संभाजी भिडे म्हणाले.