scorecardresearch

भारत-अमेरिकेची आरोग्य क्षेत्रात भागीदारी महत्त्वाची; अमेरिकन शिष्टमंडळाची सीरम इन्स्टिटय़ूटला भेट 

आरोग्याच्या क्षेत्रातील आव्हानांवर मात करण्यासाठी अमेरिका आणि भारत या दोन देशांतील परस्पर भागीदारी महत्त्वाची असल्याचे करोना साथरोग काळात स्पष्ट झाले आहे.

भारत-अमेरिकेची आरोग्य क्षेत्रात भागीदारी महत्त्वाची; अमेरिकन शिष्टमंडळाची सीरम इन्स्टिटय़ूटला भेट 
अमेरिकन शिष्टमंडळाची सीरम इन्स्टिटय़ूटला भेट 

पुणे : आरोग्याच्या क्षेत्रातील आव्हानांवर मात करण्यासाठी अमेरिका आणि भारत या दोन देशांतील परस्पर भागीदारी महत्त्वाची असल्याचे करोना साथरोग काळात स्पष्ट झाले आहे. भविष्यातील आव्हानांचा सामना करण्यासाठी या दोन्ही देशांतील भागीदारी आणखी बळकट करण्याची गरज अमेरिकन शिष्टमंडळाच्या प्रतिनिधींकडून बुधवारी व्यक्त करण्यात आली. 

 मुंबईतील महावाणिज्य दूत माईक हँकी, एचएचएस आरोग्य समन्वयक डॉ. प्रीथा राजारामन आणि अन्न आणि औषध प्रशासनाच्या स्थानिक संचालक  डॉ. सारा मॅकलुहान यांच्या शिष्टमंडळाने बुधवारी सीरम इन्स्टिटय़ूट ऑफ इंडियाला भेट दिली. या वेळी सीरमचे अध्यक्ष डॉ. सायरस पूनावाला, मुख्य कार्यकारी अधिकारी आदर पूनावाला आणि नोव्हावॅक्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी

स्टॅनली सी. अर्क यांनी  शिष्टमंडळाची भेट घेतली. 

अमेरिकेच्या अन्न आणि औषध प्रशासनाने नोव्हाव्हॅक्सच्या नोव्हॅक्सोव्हिडला मान्यता दिल्याने सीरम इन्स्टिटय़ूट ही अमेरिकेतील लस बाजारपेठेत प्रवेश मिळविणारी पहिली भारतीय उत्पादक कंपनी ठरली आहे. 

 पॅट्रिशिया लॅसिना म्हणाल्या,की अमेरिका आणि भारताच्या आरोग्यासंदर्भातील दीर्घकालीन भागीदारी दोन्ही देश आणि जागतिक स्तरावर अत्यंत प्रभावी आहे. करोना साथरोगाच्या काळात सीरम इन्स्टिटय़ूटतर्फे जगातील अनेक देशांना प्रतिबंधक लशीचा पुरवठा करण्यात आला. त्यामुळे जागतिक स्तरावरील नागरिकांच्या संरक्षणामध्ये सीरमचे योगदान अनन्यसाधारण असल्याची भावनाही लॅसिना यांनी व्यक्त केली.

अमेरिका आणि भारत या दोन्ही देशांनी आपल्या वाटचालीत अनेक मैलाचे दगड प्रस्थापित केले आहेत. जागतिक स्तरावरील लसीकरण आणि साथरोग काळात नागरिकांना दिलासा देण्याच्या कार्यातील या दोन्ही देशांमधील सहकार्य प्रेरणादायी आहे.

– आदर पूनावाला, मुख्य कार्यकारी अधिकारी, सिरम

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: India us partnership health sector important american delegation serum institute ysh

ताज्या बातम्या