scorecardresearch

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात रविवारी भारतीय भाषा उत्सव होणार साजरा

यंदापासून ११ डिसेंबर हा दिवस भारतीय भाषा दिन म्हणून पाळण्यात येणार आहे. या निमित्ताने भारतीय भाषा उत्सवाच्या माध्यमातून विविध उपक्रम आयोजित करण्याचे निर्देश यूजीसीने देशभरातील विद्यापीठे, महाविद्यालयांना दिले आहेत.

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात रविवारी भारतीय भाषा उत्सव होणार साजरा
पुणे विद्यापीठ (संग्रहित छायाचित्र)

पुणे विद्यापीठ अनुदान आयोगाच्या भारतीय भाषा उत्सव उपक्रमांतर्गत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा मराठी विभाग, पाली आणि बौद्ध अध्ययन विभागातर्फे उद्या (११ डिसेंबर) भारतीय भाषा दिनानिमित्त भारतीय भाषा उत्सव साजरा केला जाणार आहे. या निमित्ताने विविध स्पर्धांसह पाली, संस्कृत, गांधारी, सैंधवी, प्राकृत, तिबेटन, थाई, सिंहली, बर्मी भाषा, देवनागरी, सैंधवी, तिबेटी, थाई, बर्मी, सिंहली लिपींमधील छापील ग्रंथांचे हस्तलिखितांचे प्रदर्शन आयोजित करण्यात येणार आहे.

हेही वाचा- पुणे: चंद्रकांत पाटलांनी आंबेडकर आणि फुलेंबाबत केलेल्या विधानाचा निषेध; सावित्रीबाई फुले विद्यापीठात मूक आंदोलन

यंदापासून ११ डिसेंबर हा दिवस भारतीय भाषा दिन म्हणून पाळण्यात येणार आहे. या निमित्ताने भारतीय भाषा उत्सवाच्या माध्यमातून विविध उपक्रम आयोजित करण्याचे निर्देश यूजीसीने देशभरातील विद्यापीठे, महाविद्यालयांना दिले आहेत. या पार्श्वभूवीर विद्यापीठात मराठी विभागात काव्यवाचन स्पर्धा, वक्तृत्त्व स्पर्धा, दुर्मिळ ग्रंथ प्रदर्शन, माझी भाषा माझे हस्ताक्षर आदी स्पर्धा सकाळी साडे दहा वाजल्यापासून होतील. तर पाली आणि बौद्ध अध्ययन विभागात पाली, संस्कृत, गांधारी व सैंधवी प्राकृत, तिबेटन, थाई, सिंहली, बर्मी भाषा तसेच देवनागरी, सैंधवी, तिबेटी, थाई, बर्मी, सिंहली लिपींमधील छापील ग्रंथांचे आणि हस्तलिखितांचे खुले प्रदर्शन आयोजित केले जाणार आहे. प्रदर्शनाला भेट देणाऱ्यांना विविध प्राचीन लिपींमध्ये आपली स्वाक्षरी करण्याची संधी मिळणार आहे. हे प्रदर्शन सर्वांसाठी विनामूल्य असून सकाळी दहा ते सायंकाळी सहा पर्यंत खुले राहील. हिंदी विभागाकडून रांगोळी स्पर्धा, संस्कृत विभागाकडून विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 10-12-2022 at 19:41 IST

संबंधित बातम्या