पुणे : दैनंदिन जीवनातील अनेक गोष्टींसाठी अनेक जण आता इंटरनेटचा आधार घेतात. खाद्यपदार्थाच्या कृतींपासून ते एखाद्या विषयाच्या संशोधनापर्यंत इंटरनेट हा जीवनाचा भाग बनला आहे. निद्राधीन अवस्थेत पडणाऱ्या विशिष्ट स्वप्नांचा अर्थ शोधण्यासाठी इंटरनेटची मदत घेणाऱ्यांमध्ये भारतीयांचे प्रमाण सर्वाधिक आहे. त्यातही स्वप्नात दात पडताना दिसल्यास त्याचा अर्थ जाणून घेण्यात भारतीयांना विशेष रस आहे.

‘द प्लेझंट ड्रीम’ या संस्थेने इंटरनेटवर स्वप्नांचा शोध घेणाऱ्यांविषयी केलेल्या सर्वेक्षणातून अनेक निरीक्षणे नोंदवली आहेत. २०२१ आणि २०२२ या दोन वर्षांमध्ये स्वप्नांचे अर्थ शोधण्याच्या प्रमाणाचा आढावा या सर्वेक्षणात घेण्यात आला आहे. दात पडण्याच्या स्वप्नाचा अर्थ जाणून घेण्याबाबत इंटरनेटची मदत घेण्यात २०२१ आणि २०२२ मध्ये ८१ टक्क्यांनी वाढ झाल्याचे ‘द प्लेझंट ड्रीम’ संस्थेने स्पष्ट केले आहे. विशेष म्हणजे, दात पडण्याच्या स्वप्नाचा संबंध दातांच्या आरोग्याशी नसून मानसिक आरोग्याशी असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

beed lok sabha marathi news, beed lok sabha election 2024
बीडमध्ये सामान्यांच्या प्रश्नांपेक्षा आरक्षणाचाच मुद्दा प्रचारात प्रभावी
Success Story Mira Kulkarni
एकट्या मातेची मेणबत्ती व्यवसायाने सुरुवात; भारतातील सर्वांत श्रीमंत महिलांच्या यादीतील स्थानापर्यंत गरुडझेप!
dr jane goodall, dr jane goodall marathi article,
संशोधकाची नव्वदी!
loksatta editorial international labour organisation report youth unemployment In india
अग्रलेख: लाभांश लटकला!

स्वप्नात प्राणी दिसणे, आर्थिक उलाढाली, उंचावरून कोसळणे आदी प्रकारांची स्वप्ने का पडतात आणि त्यांचे अर्थ काय, हे शोधण्याचे प्रमाणही लक्षणीय असल्याचे या सर्वेक्षणात आढळले. फसवणूक होणे, कोणीतरी पाठलाग करणे या स्वप्नांचे अर्थ शोधण्याचे प्रमाण तुलनेने घटल्याचे ताज्या सर्वेक्षणातून दिसून आले आहे.

नकारात्मकतेचे दर्शन..

दात पडण्याच्या स्वप्नांचेही अनेक प्रकार या सर्वेक्षणात नोंदवण्यात आले आहेत. दात हरवणे आणि तो न सापडणे, एक एक करून सर्व दात पडत असल्याचे स्वप्न वारंवार पडणे किंवा स्वप्नात व्यक्ती स्वत:चे दात चावताना दिसणे आदी प्रकारांचे प्रमाण सर्वसाधारणपणे अधिक असल्याचा संस्थेचा निष्कर्ष आहे. या स्वप्नांचे अर्थ अनेक असून त्यांपैकी काही स्वप्ने मात्र ठामपणे नकारात्मकता दर्शवणारी असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले.

सकारात्मकता शोधावी

स्वप्नांच्या अर्थाबद्दल ‘द प्लेझंट ड्रीम’च्या मानसोपचारतज्ज्ञ डॉ. नेरिदा बेरियॉस म्हणाल्या, ‘‘दात पडण्याच्या स्वप्नाचा अर्थ बहुतांश वेळा दातांच्या आरोग्याशी जोडला जातो, प्रत्यक्षात तो मानसिक आरोग्याशी आहे. त्याबाबत जागतिक स्तरावर संशोधनही करण्यात आले आहे. बहुधा स्वप्नांचा संबंध दैनंदिन घडामोडींशी असतो. स्वप्नांचे नकारात्मक अर्थ लावून त्याचा त्रास करून घेण्यापेक्षा त्यातून सकारात्मकता शोधण्याचा प्रयत्न करावा.