scorecardresearch

Premium

मावळातील सुवासिक इंद्रायणी तांदूळ यंदा होणार महाग; जाणून घ्या कारण

पुणे जिल्ह्यातील जुन्नर, आंबेगाव, खेड, मावळ, मुळशी, भोर, वेल्हा भागात इंद्रायणी तांदळाची लागवड केली जाते.

indrayani rice production decline due to poor rain
मावळातील सुवासिक इंद्रायणी तांदूळ यंदा होणार महाग; जाणून घ्या कारण संग्रहित छायाचित्र)

पुणे : पावसाने ओढ दिल्याने मावळातील सुवासिक इंद्रायणी तांदळाच्या लागवडीत यंदा घट झाली आहे. उत्पादन कमी झाल्याने गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा इंद्रायणी तांदळाच्या भावात वाढ झाली आहे. किरकोळ बाजारात एक किलो इंद्रायणी तांदळाचे भाव  ६० रुपयांपर्यंत आहेत. सुवासिक इंद्रायणी तांदळाला गेल्या काही वर्षांपासून मागणी वाढली आहे.

पुणे जिल्ह्यातील जुन्नर, आंबेगाव, खेड, मावळ, मुळशी, भोर, वेल्हा भागात इंद्रायणी तांदळाची लागवड केली जाते. जुलै महिन्याच्या पहिल्या आठवडयात बियाणांची लागवड केली जाते. यंदा पाऊस कमी झाल्याने इंद्रायणी तांदळाच्या लागवडीत घट झाली आहे, असे मावळ तालुक्यातील शेतकरी ज्ञानेश्वर ठाकर आणि भीमराव मोहोळ यांनी सांगितले.  २० ते २५ वर्षांपूर्वी इंद्रायणीचे वाण विकसित करण्यात आले होते. या वाणाची मुदत साधारपणे वीस वर्षांची होती. मात्र, त्यात बदल करून इंद्रायणीचे वाण विकसित करण्यात आले, असे त्यांनी नमूद केले.

Beating_f9bb1c
अरे बापरे! ग्रामसभेतच निघाली तलवार, कुऱ्हाड अन् मग…
16 suspects detained in case of offensive message in Nandgaon taluka
नांदगाव तालुक्यात आक्षेपार्ह संदेशप्रकरणी १६ संशयित ताब्यात
collector vipin Itankar announced the revised voter list of nagpur district
नागपूर जिल्ह्यात नवमतदार वाढले, कौल ठरणार निर्णायक
gondia district unseasonal rain marathi news, gondia rain news in marathi
गोंदिया जिल्ह्यात अवकाळी पावसाची हजेरी

हेही वाचा >>> पुण्यातील एका कार्यकर्त्याचा असाही विक्रम…

हमी भाव देण्याची मागणी

वेल्हे तालुक्यातील राजगड, तोरणा, गुंजन मावळ भागातील शेतकऱ्यांनी इंद्रायणी तांदळाला ६५ ते ७० रुपये प्रतिकिलो भाव देण्याची मागणी केली आहे. नसरापूर आठवडे बाजारात काही शेतकरी कमी भावाने इंद्रायणी तांदळाची विक्री करतात. दरवर्षी शेतकऱ्यांकडून तांदूळ खरेदी करणारे व्यापारी भाव वाढवून देत नाहीत. लागवड खर्च, दैनंदिनी खर्चासाठी  शेतकऱ्यांनी पैशांची गरज असल्याने शेतकरी कमी भावाने तांदळाची विक्री करतात, असे वेल्हे तालुक्यातील शेतकऱ्यांनी सांगितले.

यंदा पावसाने ओढ दिल्याने लागवड कमी झाली. इंद्रायणी भातावर प्रक्रिया करुन त्याची विक्री केली जाते. काही मिलचालक थेट भात खरेदी करतात. पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने गेल्या वर्षांपासून शेतकऱ्याकडून भात (साळ) खरेदी करण्यास सुरुवात केली आहे. साळीला प्रतिकिलोचा भाव २७ ते २८ रुपयांपर्यंत आहे.

– संताजी जाधव, कृषी अधिकारी, पंचायत समिती, वडगाव मावळ

Latest Comment
View All Comments
Post Comment

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Indrayani rice production decline due to poor rain zws

First published on: 11-12-2023 at 00:20 IST

आजचा ई-पेपर : पुणे

वाचा
epaper image

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×