पुणे : ज्येष्ठ उद्योगपती आणि वाई येथील भारत विद्यालय या मराठी माध्यमाच्या शाळेचे संस्थापक अरुण किर्लोस्कर (वय ८५) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्यामागे पत्नी, दोन मुलगे, मुलगी आणि नातवंडे असा परिवार आहे.  मूळचे कोल्हापूर येथील अरुण किर्लोस्कर यांचा जन्म १३ डिसेंबर १९३६ रोजी झाला. आपल्या कर्तृत्वाच्या जोरावर प्रगती करत त्यांनी किर्लोस्कर कमिन्स कंपनीचे अध्यक्षपद भूषविले होते. नंतरच्या काळात त्यांनी मोटारीच्या उत्पादनासाठी लागणाऱ्या सुट्या उपकरणांची निर्मिती करणाऱ्या ‘फिलड्रम’ आणि ‘फ्लिपगार्ड’ या कंपन्यांची स्थापना केली होती. गेल्या काही वर्षांपासून उद्योगाची सूत्रे मुलांच्या हाती सुपूर्द करून त्यांनी सामाजिक कार्यामध्ये स्वत:ला झोकून दिले होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

किर्लोस्कर यांनी ‘रामकृष्ण चॅरिटीज’च्या माध्यमातून वाईजवळील ग्रामीण भागात भारत विद्यालय या मराठी माध्यमाच्या शाळेची स्थापना केली. त्यासाठी जमीन विकत घेऊन शाळा उभारली होती. ते स्वत: तेथे राहण्यासाठी गेले होते. साहित्याबद्दल त्यांना विशेष आवड असल्याने ‘अंतर्नाद’ या नियतकालिकासाठी शक्य ते सर्व सहकार्य आवर्जून करीत, असे भानू काळे यांनी नमूद केले.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Industrialist arun kirloskar dies akp
First published on: 23-01-2022 at 00:09 IST