पुण्याच्या महर्षीनगर परिसरात एका कचराकुंडीत मंगळवारी मृत अर्भक आढळून आल्याने मोठी खळबळ उडाली. अज्ञात व्यक्तींनी या अर्भकाला कचराकुंडीत उघड्यावर टाकून दिले होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एका नागरिकाला कचराकुंडीजवळ सहा ते सात महिन्यांचे अर्भक दिसले. त्याने तात्काळ पोलिसांना याबद्दल कळवले. पोलिसांनी घटनास्थळी येऊन हे अर्भक ताब्यात घेतले. त्यानंतर लगेचच या अर्भकाला ससून रूग्णालयात नेण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तपासणीनंतर हे अर्भकाला मृत घोषित केले. सध्या स्वारगेट पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.