scorecardresearch

पुण्यात महागाईविरोधात शिवसेनेकडून ‘लाटणं’ आंदोलन

सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी

पुण्यात महागाईविरोधात शिवसेनेकडून ‘लाटणं’ आंदोलन
महागाईविरोधात शिवसेनेचं आंदोलन

जीवनावश्यक वस्तूवरील दर स्थिर ठेवण्यात केंद्र सरकार अपयशी ठरल्याच्या निषेधार्थ पुण्यात सत्तेत सहभागी असलेल्या शिवसेनेच्या वतीनं आंदोलनं करण्यात आलं. जुनी जिल्हा परिषद इमारतीपासून जिल्हाधिकारी कार्यालयावर महागाई विरोधात लाटणं घेऊन मोर्चा काढण्यात आला. यावेळी महिलांनी सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करत दरवाढीचा निषेध नोंदवला.

यावेळी शिवसेना जिल्हा संपर्क प्रमुख उदय सामंत म्हणाले की, लोकसभा निवडणुकीपूर्वी सरकारने जनतेला आश्वासने दिली. मात्र या आश्वासनांची पूर्तता करण्यासाठी सरकार अपयशी ठरले आहे. दिवसेंदिवस पेट्रोल, डिझेल आणि घरगुती गॅसच्या दरामध्ये वाढ करण्यात येत आहे. सरकारच्या या निर्णयामुळे सामान्य नागरिकांचे जगणे कठीण झाले आहे. त्यामुळे सरकारने दरवाढ मागे घ्यावी, अन्यथा भविष्यात तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल, असा इशारा त्यांनी दिला.

या मोर्चामध्ये उदय सामंत यांच्यासह महिला संघटिका तृष्णा विश्वासराव पाटील, माजी आमदार आणि शहर प्रमुख विनायक निम्हण, माजी आमदार चंद्रकांत मोकाटे, महादेव बाबर, महापालिकेतील गटनेते संजय भोसले तसेच शहरातील नगरसेवक आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 26-09-2017 at 13:47 IST

संबंधित बातम्या